मुख्य मजकुराकडे जा

सुळकूड पाणी योजनेस विरोध करणाऱ्या पालक मंत्र्याना काळे झेंडे दाखवणार - समन्वय समिती

admin

सुळकूड पाणी योजनेस विरोध करणाऱ्या पालक मंत्र्याना काळे झेंडे दाखवणार - समन्वय समिती

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण "इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेला जाहीर विरोध करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ हे सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता इचलकरंजी मधील आयजीएम हॉस्पिटल येथील सीटीस्कॅन व अतिदक्षता विभाग उद्घाटन समारंभासाठी येत आहेत. यावेळी ना. हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येईल आणि निदर्शने करण्यात येतील.” असा कार्यक्रम इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. “या निदर्शनामध्ये इचलकरंजी शहरातील नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे आणि त्यासाठी सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता अण्णा रामगोंडा शाळेनजीक भाजी मार्केट मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे” असे जाहीर आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Advertise
Advertise

इचलकरंजी शहरासाठी सुळकुड पाणी योजना कार्यान्वित व्हावी या मागणीसाठी इचलकरंजी शहरांमध्ये सातत्याने आंदोलन सुरू आहे. तथापि इचलकरंजीच्या या मागणीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी उघड व स्पष्ट विरोध केला आहे. त्याचबरोबर “रक्ताचे पाट वाहतील” अशी अत्यंत बेजबाबदार व चिथावणीखोर विधाने केली आहेत. त्यामुळे शहरातील सर्व चार लाख जनतेच्या मनामध्ये ना. हसन मुश्रीफ यांच्या बद्दल तीव्र असंतोष आहे. शहराला पाणी देण्यास जे विरोध करतात, त्यांनी शहरात येऊच नये, ही शहरातील नागरिकांची स्पष्ट भावना उघडपणे बोलली जात आहे.

Advertise
Advertise

इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १३ ऑक्टोबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण झाले. तथापि ११ सप्टेंबर नंतर आज अखेर गेल्या अडीच महिन्यात संबंधित लोक प्रतिनिधी व मंत्री यांचेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही याबद्दल शहरातील नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे.
इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालय, महासत्ता चौक, येथे आज झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये अजितमामा जाधव, शशांक बावचकर, मदन कारंडे, पुंडलिकराव जाधव, रविंद्र माने, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, नितीन जांभळे, राहुल खंजीरे, रीटा रॉड्रिग्युस, भाऊसाहेब आवळे, अभिजित पटवा, प्रसाद कुलकर्णी, अहमद मुजावर, विकास चौगुले, प्रताप पाटील, जाविद मोमीन, विजय जगताप, वसंत कोरवी, राजू आलासे इ. मान्यवर उपस्थित होते.