श्री स्वामी समर्थ.
नमस्कार मंडळी.
दैनंदिन जीवन जगत असताना आपण स्वामींची भक्ती करतो विविध देवतांचे भक्ती करतो आपल्या उपास्य देवतेसमोर नतमस्तक होतो.आपल्या कुलस्वामिनीची,कुलस्वामिची उपासना करतो. आपला एकच उद्देश असतो की त्या भगवंताच्या चरणी लिन व्हावे व आपल्या जीवनाचा उद्धार करावा.
पण भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी काय करावे याची मात्र आपल्याला कल्पना नसते.यावर स्वामी म्हणतात नामस्मरण हा भगवंताशी जोडण्याचा एक उत्तम मार्ग आहे.नामस्मरणामुळे भगवंतावरील प्रेम वाढते.मात्र त्यासाठी विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे,स्वामीवर निष्ठा ठेवली पाहिजे.
नामस्मरण करून व्यवहारातले प्रयत्नही सुरू ठेवले पाहिजेत.शेवटी यश देणारे स्वामी महाराज आहेत हा आपल्या अंगी भाव असला पाहिजे. स्वामी महाराजांना शरण जावे ते आपल्याला नक्कीच या संकटातून बाहेर काढतील, आपल्याला मार्ग दाखवतील हा दृढ विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे.
आपण ज्याप्रमाणे आपल्या परिवारावर प्रेम करतो त्यांना आपले म्हणतो आणि या आपलेपणामध्येच प्रेम दडलेले असते.त्याच पद्धतीने आपल्या कुलदेवतेला,आपल्या इष्ट देवतेला स्वामींना आपले मानले तर आपले त्यांच्याप्रती प्रेम नेहमीच वाढेल. व स्वामीही आपल्या पाठीशी आपल्या कृपेची छत्र छाया नेहमी ठेवतात.
जीवन जगत असताना आपल्याला ज्या रस्त्याने जायचं आहे त्या रस्त्याने जावे.वाटेत काय वाढून ठेवले याचा विचार करू नये.कारण आपल्याला गावाला जाणे महत्त्वाचे आहे.त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यात अनेक अडचणी येतात मात्र आपले परम ध्येय काय आहे याचा शोध घ्यावा व त्या मार्गाने मार्गक्रमण करावे.शेवटी यश देणारे स्वामी आपल्या पाठीशी आहेतच.म्हणून स्वामी म्हणतात तू प्रामाणिकपणे कष्ट कर “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.
टीप-सदर माहिती विविध प्रकारच्या स्रोताद्वारे एकत्रित केली असून याद्वारे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. केवळ समाजमान्य, अध्यात्मिक, ज्योतिष शास्त्रातील कथा,माहिती देणे एवढाच उद्देश आहे.धन्यवाद