
आयुष्य जगत असताना प्रत्येकाला नवनवीन अनुभव येत असतात.अनेक घटना घडत असतात .काहीजण चांगल्या गोष्टीकडेही वाईट नजरेने बघतात,तर काही लोकं वाईट गोष्टींकडे ही चांगल्या नजरेने बघतात.हर किसिका नजरिया अलग अलग होता है.एकदा एका कंपनीत पगार वाढ करताना ,एक साहेब म्हणाले ;तुम पहले अच्छे काम करते थे, आप के बारे में मैने सुना है.लेकीन 3-4 महिने से आप का काम अच्छा नही हो रहा है.न राहूनही मी म्हटलंच,सर हर किसिका नजरिया अलग होता है,आप ने मेरे बुरे काम को सोचा,अच्छे काम को नही देख पाए.अशी असतात माणसं….आयुष्य खूप सुंदर आहे फक्त साहेबाची गुलामगिरी करता आली पाहिजे.हे त्यावेळी कळलं .कारण या जगात हुजरेगिरीला खूप महत्व दिलं जातं.
अशीच एक गोष्ट
समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाटआली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली…..
तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि,
“समुद्र चोर आहे”.
त्याच समुद्राच्या दुस-या बाजुला मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि,”समुद्र पालनकर्ता आहे”.
एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते ,समुद्र खुनी आहे”.
एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकत फिरत असतो ,त्याला एका मोठ्या शिंपल्यात एक अनमोल मोती सापडतो तर ,तो वाळुवर लिहीतो
“समुद्र दाता है”.
यानंतर अचानक एक मोठी लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते.
लोकं काहीही म्हणू द्या.परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो.आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो.
जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या बोलण्याकडे, टोमण्यांकडे लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे…
भूतकाळातील विचार करत बसायचं नाही. यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये.जर जीवन सुख, शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता.त्यामुळे जिना है तो अपने हिसाब से जियो….क्योंकी जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है..so