“सातबारा” पहा आपल्या मोबाईल वर

नमस्कार मित्रांनो


आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत, जो तुमच्या जिव्हाळ्याचा आहे.तुमच्या प्रॉपर्टीशी निगडित असा विषय आणि प्रत्येकाला याची माहिती असलीच पाहिजे. आपण खूप शिकलेलो असलो तरी याबाबत आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अनेकदा कर्ज प्रकरण करताना किंवा अनेक कामासाठी, ज्यावेळेस सातबारा हवा असतो त्यावेळी काय करावे सुचत नाही.अनेकांना सातबारा कुठे मिळतो हे देखील माहीत नसते.अशावेळी आपल्याला ही सातबारा कसा काढावा आणि आपले नाव सातबारा पत्रकी आहे हे कसे पाहावे? हे आपण पाहणार आहोत.

आपला सातबारा आपल्याला तलाठी कार्यालय म्हणजेच चावडी मध्ये मिळतो.मित्रांनो सातबारा म्हणजे तो महसूल पुरावा ज्या महसूल पुराव्यामध्ये आपले नाव,आपल्या जागेची /शेतीची माहिती तसेच आपल्या नावावर असलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ याचे सविस्तर वर्णन दिलेले असते. यामध्ये आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, पडसर आहे बागायती आहे याचे सविस्तर विवेचन आपल्या सातबारावर केलेला असते.

सातबारावर काय असते तर जमिनीचा भूमापन क्रमांक असतो, गावाचे नाव असते, जमिनीचे क्षेत्रफळ असते, जमिनीची भूतकाळ तसेच वर्तमान काळातील मालकी हे सर्व त्या सातबारा मध्ये समाविष्ट असते. तसेच सातबारावर फेरफार केलेला नंबरही पाहायला मिळतो. यावरून आपण कधी फेरफार केलेला आहे याची आपल्याला माहिती मिळते.

आता आपण बघूया सातबारा(7/12) कसा शोधायचा
मित्रांनो सातबारा काढण्यासाठी तुम्ही गुगलवर सातबारा हा शब्द टाईप केल्यानंतर तुम्हाला महाभूलेख म्हणून एक साईट दिसते.या साइटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा असलेले भूमी अभिलेख पेज ओपन होते. या पेज मध्ये उजव्या बाजूला डिजिटल सातबारा,आपली चावडी हे ऑप्शन आहेत. या खाली सहा प्रशासकीय विभाग असलेले चौकोन कॉलम दिसतो.यावर क्लिक करा. यानंतर आपला विभाग निवडा व Go या ऑप्शन वर क्लिक करा.यानंतर जिल्हा निवडा या ऑप्शन वर क्लिक करा. यामध्ये आपला जिल्हा निवडा. त्यानंतर तालुका निवडा. यानंतर गाव निवडा या ऑप्शनवर क्लिक करून आपले गाव निवडायचे आहे.

याला क्लिक केल्यानंतर खाली दोन ऑप्शन दिसतील.सर्वे नंबर किंवा आपल्या नावानुसार पहिले नाव मधील नाव, आडनाव. यामध्ये सर्वे नंबर या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा.

यानंतर खाली एक रिकामा बॉक्स दिसेल यामध्ये आपल्या मिळकतीचा गट नंबर त्यामध्ये टाकायचा आहे.यानंतर “शोधा” या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक रिकामा बॉक्स दिसेल, यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही टाकलेला गट नंबर ला पुन्हा एकदा क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर 7/12 पहा या option वर क्लिक करा. यानंतर Captcha टाईप केल्यानंतर verify captcha सातबारा यावर क्लिक करा.यावर क्लिक केल्यानंतर आपला डिजिटल सातबारा तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता.
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *