माझी म्हणू का…ही फियाट गाडी माझी म्हणू का..

माझी म्हणू का…
अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का..
कुणाची ???आमच्या वामन दादांची…
म्हणा की म्हणा…
माझी म्हणू का,ही फियाट गाडी माझी म्हणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का
दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का..
दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का..
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का ||धृ||

आम्ही पोंपम करावं तुम्ही बाजूला सरावं
म्या पोंपम करावं तुम्ही बाजूला सरावं
कुणी आडवं आलं तर म्या बिरेक मारावं
कुणी आडवं आलं तर म्या बिरेक मारावं
हितं मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का
हितं मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का ||१||

ही बसली मनात काळजाच्या खणात
ही बसली मनात काळजाच्या खणात
म्या थोडंसं रमावं माह्या तरुण पणात
म्या थोडंसं रमावं माह्या तरुण पणात
चांदणी राती हिला जराशी फिरवून आणू का
चांदणी राती हिला जराशी फिरवून आणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का ||२||

वामनाच्या सुरात,असं राज दोरात
वामनाच्या सुरात,असं राज दोरात
हिची काढू का वरात,हिला नेऊ का घरात
हिची काढू का वरात,हिला नेऊ का घरात
ह्याच आशेनं हेच गाणं असंच म्हणू का..
ह्याच आशेनं हेच गाणं असंच म्हणू का..||३||

माझी म्हणू का,ही फियाट गाडी माझी म्हणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का
दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का..
दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का..
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का
माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का.

  गीतकार - वामन दादा कर्डक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *