स्वामी म्हणतात,कोणतंही काम होतच नाही,प्रत्येक कामात अडचणी अडचणी,मार्ग सापडतचं नाही मग करा हे काम

श्री स्वामी समर्थ.
नमस्कार मित्रानो.

आपल्या हृदयावर विराजमान असलेलं नाव स्वामी.स्वामी आपल्याला प्रत्येक संकटात तारतात. सकाळी घरातून बाहेर पडताना केवळ स्वामींची सेवा केल्याने आपल्यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो.तुम्ही ज्या देवाला नमस्कार करून बाहेर पडता तो देवही तुमची परत येईपर्यंत वाट बघतो.तो तुमचं रक्षण करतो.

स्वामी म्हणजे आपलं आराध्य दैवत.स्वामींच्यावर आपण नेहमीच निस्सीम प्रेम करतो.कारण स्वामी आपल्या प्रत्येक चांगल्या कामात मदत करतात.आपण खूप प्रयत्न करूनही खूप वेळा अपयश येते मग आपण खचून जातो.पण स्वामी म्हणतात खचून जाऊ नको,मी आहे ना सोबत.स्वामी म्हणतात आज त्रास होत आहे,पण तुला सुख नक्की मिळेल.

स्वामी म्हणतात कोणतेही काम करताना त्यामध्ये जीव ओतून काम कर.त्यामध्ये कधी शंका घेऊ नकोस. ते काम कसे होईल,त्यामध्ये काय अडचण येईल,मला जमेल की नाही, याची तू कधी शंका बाळगू नकोस. कारण प्रत्येक काम हे प्रत्येकासाठी नवीनच असते.त्यामुळे काही ना काही तरी शिकायला मिळते.

स्वामी म्हणतात कोणत्याही कामावर शंका न घेता निर्भयपणे काम केलं तर तुला त्यात यश मिळेल आणि बाकी मी आहेच पाठीशी;त्यामुळे तुला घाबरण्याची गरजच नाही.आपण स्वामींना म्हणतो की स्वामी तुम्ही माझ्या सर्वस्व आहात, तुम्ही मला सर्व काही देता.मात्र वेळ आली की आपण डगमगतो.

ज्याप्रमाणे नदी मध्ये पडल्यानंतर पोहता येत नसेल तर आपण घाबरून जातो,आपल्याला बुडण्याची भीती वाटते.कोणीतरी आपल्याला वाचवण्याची आपण याचना करतो,त्यावेळी स्वतःचा विश्वास आपल्यावर नसतो. त्याच पद्धतीने आपल्याला संकट आले की आपण डगमगून जातो.आपण विचार करतो,खरंच आपण यातून तारु की नाही.

खरच आपल्याला स्वामी यातून बाहेर काढतील का? हा भाव आपण निर्माण करतो.त्यामुळे आपण आपल्या ध्येयापासून विचलित होतो. मात्र स्वामी सांगतात कोणतेही काम करताना तुम्ही माझ्यावर सोपवून द्या,मी आहे ना सोबत असा मनाशी निश्चय करा.तुम्हाला त्या कामात कोणतीच अडचण येणार नाही.कारण मी प्रत्यक्ष त्या कामांमध्ये तुम्हाला साथ देईल.

ज्या ठिकाणी स्वामींचा वास आहे तिथे काहीच कमी पडत नाही.तुम्ही फक्त स्वामींच्यावर सोपवून दिल्यानंतर,स्वामी तेथे काहीच न्यून आणत नाहीत.म्हणून म्हणतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वामी सर्वस्व आहेत ते ठरवतील की काय करायचं.तुम्हाला विचार करण्याची गरज नाही.ते परमात्मा,परम पिता स्वामी आपल्या भक्ताचं कधीच हसू होऊ देत नाहीत.कारण तुम्ही स्वामींचे भक्त आहात आणि गुरु कधीच आपल्या शिष्याला त्रास होऊ देत नाहीत हा इतिहास आहे.

आपण अनेकदा बघतो की रस्त्याने जाताना दोन गाड्यांची धडक होते. यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात.असे असून सुद्धा यामध्ये कधी कधी दोन किंवा तीन वर्षाचे लहान मुलं सुद्धा जगतात.मग जर धडकल्यानंतर मोठी लोकं मृत्युमुखी पडत असतील तर त्या लहान मुलाचा जीव वाचू कसा शकतो.त्यावेळी लोक म्हणतात,”काळ आला होता पण वेळ आली नव्हती”.

पण मित्रांनो हेच तुम्हाला सांगायचे आहे की जिथे स्वामींचा हात आहे विश्वास आहे आशीर्वाद आहे त्या ठिकाणी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.कारण स्वामींच्या आज्ञेविना काळही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही.त्यामुळे तुम्हाला त्या काळाला घाबरण्याची गरज नाही.कारण त्या काळाला ही माहिती आहे की तुमचा रुक्मिणीकांत स्वामी आहेत.

जिथे स्वामी आहेत तिथे काळालाही माघार घ्यावीच लागते.म्हणूनच जिथे सगळे प्रयत्न असमर्थ ठरतात तिथे स्वामी समर्थ असतात.म्हणून स्वामींचे दास व्हा स्वामी तुमच्यावर कृपा जरूर करतील.

सदर माहिती विविध स्रोताद्वारे एकत्रित केली असून याद्वारे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. केवळ समाजमान्य कथा,माहिती दिली जाते. त्याचा कोणीही अंधश्रद्धा म्हणून वापर करू नये.धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *