श्री स्वामी समर्थ
आपण स्वामींचे भक्त,स्वामींची नेहमीच सेवा करत असतो.केंद्रामध्ये जात असतो.आपल्या मनातील दुःख सांगत असतो.स्वामी अडचणीतून नक्की मार्ग काढतात हा आपला अनुभव आहे.स्वामी म्हणतात या जगात माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. कुणाचाही तिरस्कार करू नका.आपण सगळे एकाच प्रभूची लेकरे आहोत.सर्व जिवामध्ये एकच चैतन्य आहे.
कोणतेही काम करताना नियोजनपूर्वक करा.सकाळी लवकर उठून कामास सुरुवात करा.उठल्यानंतर देवाची पूजा करून देवाला नमस्कार करा.घरातून बाहेर पडताना देवाला सांगा की मी बाहेर जात आहे,माझ्यावर तुमची कृपा असुदे.
माझ्याकडून चांगले कर्म घडो अशी प्रार्थना करा.
जे काही चुकले असेल त्याबद्दल क्षमा मागा.व आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात करा.ही पथ्ये पाळली तर स्वामी आपणांस सदैव आशीर्वाद देतील.धन्यवाद..
श्री स्वामी समर्थ.