रॉयल प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेत जिम संतोषम स्पोर्टस् विजेता

कबनूर/प्रतिनिधी
रॉयल क्रिकेट क्लब आयोजित रॉयल प्रीमियर लीग सीजन एकचे विजेतेपद तौफिक अपराज यांच्या कॅप्टनसीमध्ये जिम संतोषम स्पोर्टसने पटकावले.

प्लास्टिक बॉल क्रिकेट लिग मध्ये सहा संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जिम संतोषम स्पोर्टस् ने विजेतेपद पटकावले.तसेच आरएस स्पोर्ट्स यांनी द्वितीय क्रमांक व एस के स्पोर्ट्स यांनी तृतीय क्रमांक पटकावला.बेस्ट बॉलर अहमद खलिफा,बेस्ट बॅटसमन प्रीतम कटेगिरी व मॅन ऑफ द सिरीज प्रकाश पवार यांनी पटकाविले.

या लीगसाठी रॉयल क्रिकेट क्लब चे अध्यक्ष बाबाजान अपराज,टिपू मुजावर, निहाल मुजावर, तोफिक अपराज,प्रकाश पवार,युवराज घाटगे, अल्ताफ मुजावर, प्रीतम कटेगरी, अजित पवार तसेच त्यांचे सहकारी यांनी लीगच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न घेतले.

तसेच या स्पर्धेसाठी कबनूर गावचे उपसरपंच शसुधीर लिगाडे, समीर जमादार, शाहीर गुलाब अपराज, संजय आंबे,संजय केसरकर ,दत्तात्रय कोदारे,अजिज शेख,गणेश रेणके, बजरंग भोजने,केदार जाधव या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *