आता रडायचं नाही संकटांना भिडायचं,रडायचे दिवस संपले..

श्री स्वामी समर्थ
नमस्कार मित्रांनो

आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की आपण एखादे चांगले काम करु लागलो की त्यामध्ये आडवे येणाऱ्यांची संख्या खूप अधिक असते.अशी काही लोक असतात जे आपल्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ज्यांची पात्रताही नसते.त्यावेळी आपण निराश होऊन जातो.

आपल्या मनात हा विचार येतो की आपण चूक तर करत नाही आहोत ना?आपण जो मार्ग निवडला आहे तो सत्यच आहे.मात्र अनेक जण याबाबत तक्रारी करत आहेत.मग आपलं चुकतंय का?आपण थांबलं पाहिजे का?असे अनेक प्रश्न मनामध्ये येतात.

मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळी सत्याच्या मार्गावरून चालू लागता,त्यावेळी लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही लोकांचे नुकसान करत आहात असा भ्रम निर्माण करत असतात.मात्र तुम्ही ज्यांच्यासाठी काम करत असता त्या लोकांच्या साठी तुम्ही देव असता हे विसरू नका.

महाभारतामध्ये दुर्योधनाच्या राज्यामध्ये खूप अन्याय झाला अत्याचार झाला.त्यावेळी अर्जुन रुपी अवताराने दुर्योधनाचा नाश केला.कारण दुर्योधनाला ही गर्व झाला होता.यावेळी अर्जुनालाही वाटत होते की जे दुर्योधन व कौरव आहेत ते आपले आप्तेष्ट आहेत, त्यांना मी कसा काय मारू? यापेक्षा मला राज्य नको किंवा काहीच नको असे म्हणून अर्जुन विचार करू लागला होता.

यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला पटवून दिले की युद्ध करणारा तू कोणी नाहीस,तू एक निमित्त आहेस.तुला बुद्धी देणारा,शक्ती देणारा,निर्माण करणारा तो परम परमात्मा ईश्वर आहे.तो सर्व करून घेतो.तो मनातून हे काढ की प्रत्येक गोष्ट मी करतो.प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराच्या आदेशाने होत असते.आपण निमित्त असतो.

त्यामुळे आपण कोणतीही वाईट गोष्ट रोखण्यासाठी प्रयत्न करत असू तर तुम्ही समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर आहात.ज्यावेळी तुम्हाला लोक उणे दुणे बोलत असतील,वाईट बोलत असतील तर त्यांचा विचार अजिबात करू नका.कारण खोट्याला साथ देणे म्हणजे स्वतः खोटे बोलण्यासारखेच आहे.त्यामुळे अशा लोकांचा तुम्ही कधीच विचार करू नका

जे लोक तुम्हाला वाईट बोलतात,तुमच्या गैरहजरीमध्ये तुमची मापे काढतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.कारण त्यांचा इतिहास बघितला तर दुसऱ्याच्या जीवावर जगणे व लोकांच्यावर टीकाटिप्पणी करून दिवस व्यतीत करणे एवढाच त्यांचा अट्टाहास चालू असतो.

दुसऱ्याच्या कामामध्ये लुडबुड करून स्वतःचा फायदा करून घेणारे कधीच समाजासाठी आदर्श असू शकत नाहीत.केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी,एखाद्या चुकीच्या गोष्टीला समर्थन करून आला दिवस ढकलणे व त्यातून आर्थिक हीत साधण्यासाठी अशी मंडळी चांगल्या खऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी करत असतात.

त्यामुळे तुम्ही एखादी चांगली गोष्ट करताना सत्याच्या मार्गावर जाताना वाटेमध्ये अनेक अडथळे येतील.मात्र तुम्ही हा विचार करा की आपल्याला सत्याच्या मार्गाने जायचे आहे.कारण देवाच्या मनात इच्छा असेल की आपण एखाद्याला न्याय द्यावा व ती ईश्वराची इच्छा पूर्ण करण्याचे आपण कर्तव्य पार पाडले पाहिजे.

अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा, माहिती आवडली असल्यास शेअर करा.धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *