काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना ||धृ||
बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंग
जीन्सच्या कापडामंदी दुनिया झाली कशी तंग
जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग
म्हाताऱ्याच्या धोतराची गाट सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना ||1||
पारी आली ,सरी गेली,झाली त्याची तारी
पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदीफिरती साऱ्या पोरी
म्हातारीच्या डोईवरचा पदर सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना ||2||
शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती
ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का गं राती
सर्जा राजाची गं जोडी माग हटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना ||3||
गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी
प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळीदिवाळीच्या सणामंदी जमली ही मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरण पोळी
चुलीवरच्या भाकरीची चव ही सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना ||4||
हो शहरातली पोरं कशी साहेब झाली
गावाकडली पोरं आता पाराखाली आली
मास्तरांच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली
राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली
शांतेचं कारटं अजून दहावी सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना ||5||
Written by -Ganesh Shinde