श्री स्वामी समर्थ.
नमस्कारमित्रांनो

वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूची एक दिशा सांगितलेली आहे आणि त्या दिशेला आपण त्या त्या वस्तू ठेवणे खूपच गरजेचे आणि लाभदायी देखील आपल्याला ठरते.असे मानले जाते.तर आपण दररोज जेवण हे करतच असतो.परंतु शास्त्रामध्ये आपल्याला कोणत्या दिशेला तोंड करून जेवन्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते ते आपल्यासाठी लाभदायी ठरते हे देखील पाहायला मिळते.याबाबत माहिती जाणून घेऊयात.
आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपणाला खूप सार्या गोष्टींची माहिती पहायला मिळते.ज्यावेळेस नवीन घर बांधतो त्यावेळेस आपण वास्तुशास्त्रांचे नियम जाणून घेऊन आपण त्या घराची रचना करतो. जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष निर्माण होणार नाही.जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला तर घरामध्ये सतत कटकटी,भांडणे होत राहतात.अनेक प्रकारच्या अडचणी येत राहतात.पैशासंबंधी चणचण निर्माण होते.त्यामुळे वास्तुशास्त्राचा अभ्यास करूनच आपण कोणत्याही गोष्टी करणे आपल्या जीवनासाठी उत्तम मानले गेलेले आहे.

आपल्या घरामध्ये सतत पैशाची अडचण भासत राहते परंतु आपल्या जेवणाच्या दिशेवरून देखील पैशाची आवक ही ठरते.आपण योग्य त्या दिशेला तोंड करून जर जेवलो तर लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरामध्ये राहतो.तर पूर्व दिशेला तोंड करून जर तुम्ही जेवत असाल तर हे आपल्यासाठी खूपच चांगले आहे.यामुळे मेंदू हा आपला उत्साही राहतो.तसेच आपले आरोग्य देखील चांगले राहते असे मानले जाते.
कोणत्याही प्रकारचे रोग देखील आपणाला उद्भवणार नाहीत.जी काही रक्ताभिसरण क्रिया असते ती नीट होते.तसेच जे आपण जेवतो ते अन्न व्यवस्थित पचले देखील जाते.या दिशेने तोंड करून जेवलात तर माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिशेने तोंड करून जेवण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात व आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते.
तसेच आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत राहतो.त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून जेवण करणे लाभदायी आपणासाठी ठरते.
तसेच पश्चिम दिशेला तोंड करून जेवणे हे देखील आपणासाठी फायदेशीर ठरते. म्हणजेच जे आपल्यापैकी व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार वर्ग म्हणजेच ज्या लोकांचे बुद्धीशी संबंधित काम असेल अशा लोकांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवणे उत्तम ठरते.

जर तुम्हाला लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी असे जर वाटत असेल तसेच आपल्याला अधिकाधिक ज्ञान येत रहावे तसेच जर दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून जेवण अवश्य करावे.कारण उत्तर दिशा ही देव दिशा मानली जाते आणि या दिशेला तोंड करून खाल्ल्याने आपणाला पैशाची कमतरता कधीही भासत नाही.
कारण जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी ही दिशा अन्नासाठी खूपच योग्य मानली जाते.यामुळे त्यांना भरपूर ज्ञान अवगत होते.त्यांची बुद्धिमत्ता देखील वाढते.त्यामुळे तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करणे तुमच्यासाठी लाभदायी अवश्य ठरेल.
आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत जे दक्षिण दिशेला तोंड करून जेवत असतात.परंतु मित्रांनो दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे हे आपल्यासाठी खूपच नुकसानकारक ठरते.कारण ही दिशा मृत लोक आणि पूर्वजांची दिशा मानली गेलेली आहे. त्यामुळे या दिशेने बसणे आणि अन्न खाणे म्हणजेच आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो.
तसेच जे लोक दक्षिणेकडे तोंड करून अन्नग्रहण करतात त्यांचा अकाली मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.त्यामुळे शक्यतो करून तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे टाळायचे आहे. ज्यामुळे मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत.

तर वरील सांगितलेल्या या माहितीनुसार तुम्ही देखील योग्य त्या दिशेला तोंड करून जेवल्यास लक्ष्मीची प्राप्ती आपणाला होऊ शकते.तर हा उपाय करून बघायला हरकत नाही.
सदर माहिती विविध प्रकारच्या स्रोताद्वारे एकत्र केली असून यातून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.केवळ पुराणकालीन,शास्त्रातील माहिती,कथा लोकांना व्हावी एवढाच उद्देश आहे.याचा कोणीही अंधश्रद्धा म्हणून उपयोग करू नये.धन्यवाद.