श्री स्वामी समर्थ
नमस्कार मित्रांनो.
आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक स्वामी समर्थांचे सेवेकरी आणि भक्त दिसून येत असतात. ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने स्वामी समर्थांची पूजा व नामस्मरण करत असतात.दररोज सकाळी स्नान करून देवघरातील स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसून ते स्वामी समर्थांचे पूजन करत असतात.त्याप्रमाणे त्यांना अभिषेक ही घालत असतात.अशा प्रकारे स्वामी समर्थांचे सेवेकरी रोज न चुकता स्वामी समर्थांची पूजा अगदी मनापासून करत असतात.
वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत.ज्याच्यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपले मनातील सर्व ओळखतील आणि न मागता आपल्याला वस्तू मिळत जातील.असे मानले जाते.हा उपाय आपण कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल आणि कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी त्याचे फळ त्याला नक्की मिळेल.जर हा उपाय दररोज नित्य नियमाने केला त्याचा जास्त चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल चला तर पाहुयात कोणता आहे हा प्रभावी उपाय.
हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी करू शकतात.त्यानंतर तुमच्या घरात ज्या ठिकाणी स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती आहे त्या ठिकाणी जाऊन त्या प्रतिमेसमोर तुम्हाला बसायचे आहे आणि शक्य असल्यास तिथे अगरबत्ती किंवा धूप लावायचे आहे.त्यानंतर तुम्ही स्वामींच्या प्रतिमेसमोर शांत बसून राहा काहीही बोलू नका.कोणतीही कृती करू नका आणि स्वामींकडे कोणतीही गोष्ट मागू नका फक्त शांत बसून राहा.तुमचे आणि स्वामी मधले संभाषण फक्त डोळ्यांनी करत राहा.म्हणजेच सारे संभाषण नजरेतुन व्हावे असे बसा.
दिवसभर काम करून थकल्यानंतर ज्याप्रमाणे आपण आपल्या आईपाशी जाऊन बसतो किंवा झोपतो.कारण आपल्याला आईच्या कुशीमध्ये शांतता आराम मिळतो,त्याचप्रमाणे त्याच भावनेने तुम्हाला स्वामी समर्थांच्या समोर बसायचे आहे,स्वामींच्याकडे कोणतीही गोष्ट मागायची नाही.फक्त स्वामींकडे पाहत राहायचे आहे.तुमच्या शरीरातील थकवा घालवा.जे काही तुम्हाला हवे आहे ते तुम्ही डोळ्यांनी मागा,तुमच्या मनामध्ये त्याचा विचार करा स्वामी तुमचे नक्की ऐकतील. जी कोणती गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे ते स्वामी समर्थ ओळखतील आणि सर्वकाही देतील.
अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थांच्या समोर किंवा मूर्तीसमोर दिवसातून कमीत कमी पाच ते दहा मिनिटं बसायचे आहे.काहीही न बोलता आणि कोणतीही कृती न करता फक्त डोळ्यातून स्वामी समर्थांच्या बरोबर संभाषण करण्याचा प्रयत्न करायचा आहे.तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे तिचा मनामध्ये विचार करायचा आहे.हा उपाय तुम्हाला दररोज नित्य नियमाने अगदी मनापासून करायचा आहे.सकाळ संध्याकाळ,दुपारी ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी तुम्ही शांत बसून हा उपाय नक्की करा.
सदर माहिती विविध स्त्रोताद्वारे एकत्रित केलेली असून,याद्वारे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.केवळ समाजमान्य, ज्योतिषशास्त्रातील माहिती कथा माहित व्हावे यासाठी हा प्रयत्न.याचा कोणीही अंधश्रद्धा म्हणून चुकूनही वापर करू नये.धन्यवाद.