श्री स्वामी समर्थ.
देवाला जवळ जवळ सगळेच मानतात.अपवाद वगळता देवाला मानत नाही अशी व्यक्ती सापडणार नाही.भक्तिमार्ग हा प्रत्येकाच्या नशिबात असेल असे नाही कारण भक्ती करणे हा आपल्या पूर्व सुकृताचा भाग आहे.ज्याच्या त्याच्या नशीबाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात लोक भक्तीकडे आकर्षित होतात.कारण चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात तर वाईट गोष्टी आकर्षित करतात.
देव म्हणजे तरी काय असा प्रश्न प्रत्येकाला पडतो.प्रत्येकाच्या मनात देवाची नावे,देवाचे प्रकार वेगवेगळे असतात.मात्र देव एकच आहे हेही तितकेच खरे आहे.कोणी देव दगडात शोधतो कोणी देवळात शोधतो तर कोणी माणसांत शोधतो.तुमची जशी नजर तसा देव भेटतो.कारण अशी कोणती जागाच नाही तिथे देवाचं अस्तित्व नाही.देव नाही हे म्हणायला पण त्या देवाने दिलेलं चैतन्य असावं लागतं.त्याशिवाय बोलणं अशक्य आहे.
मलाही देव भेटतो पण तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुपात भेटतो.देव म्हणजे अशी शक्ती जे ही विश्व चालवते.ज्यावेळी तुम्ही अनन्यभावे देवाला शरण जाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत देवाचं अस्तित्व दिसेल.कारण देव प्रत्येकवेळी मंदिरात राहील असा नाही,तो गरीबाच्या हृदयात आहे,तो गरजवंतांच्या गरजेत आहे,तहानलेल्याच्या पाण्यात आहे.
देव हा ओळखता आला पाहिजे. यावर संत गाडगेबाबा म्हणतात,जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,तोचि साधू ओळखावा,देव तेथेचि जाणावा.कारण रंजल्या गांजलेल्या दुःख पीडितांची सेवा करणे ही देखील देवाची सेवा होय.देव प्रत्येकाच्या हृदयात वसलेला असून माझ्यात जे चैतन्य आहे तेच समोरच्या व्यक्तीत आहे याची अनुभूती येणे म्हणजे देव सापडणे.
देव आपल्या अवती भोवतीच असतो तो शोधला पाहिजे.स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला मदत केली नाही तरी चालेल पण स्वतःच्या ताटातील एक चतकोर भाकर भुकेल्या व्यक्तीच्या मुखात जाणे ही दैवत्वाची प्रचिती आहे.त्यामुळे स्वतः जगता जगता दुसऱ्याला जगण्यास मदत करणे हीच खरी सेवा आहे.
देव तुमच्यात आहे आमच्यात आहे प्रत्येकात आहे पण त्याचा शोध घेतला पाहिजे.संतांना आपण देव मानतो कारण त्यांना आपल्यातील दैवत्वाची प्रचिती येते.ते कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत.कारण त्यांचं सर्वस्व तो भगवंत असतो,व त्यांची कृपा सद्गुरूंवर असते.त्यामुळे सद्गुरुंमध्ये देवाचा वास असतो.म्हणून स्वामी म्हणतात तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा.देव तुमच्या सोबत आहे.
अशाच अध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला लाईक करा,शेअर करा.स्वामी आपल्या सोबत आहेतच.धन्यवाद.