
नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ
या जगात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय, प्रत्येकालाच पैसा हवाहवासा वाटतो.मात्र तो कसा कमवावा हे कळत नाही. कधी-कधी कमवलेला पैसा घरात टिकत नाही तर घरात असलेला पैसा कोणत्या कारणाने खर्च होतो हे देखील कळत नाही. यासाठी घरातून गरिबी दूर कशी करावी व पैसे कसे घरामध्ये टिकून राहतील यासाठी आपण एक छोटासा उपाय आपल्याला सांगणार आहोत.
सदर उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुपये,दोन रुपये,पाच रुपये किंवा दहा रुपये यापैकी कोणताही एक कॉइन घ्यायचा आहे. तसेच या सोबत तीन-चार वेलदोडे म्हणजेच इलायची घ्यायची आहे.
एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा खरेच त्याला पैशाची गरज असेल, की ज्याला आर्थिक चणचण भासत आहे,अशा व्यक्तीला हा कॉइन किंवा डॉलर दान म्हणून द्यायचा आहे.
सदर कॉइन दान केल्यानंतर त्या व्यक्तीला इलायची खायला द्यायची आहे.ती व्यक्ती इलायची खाईल किंवा कधी-कधी खाणार नाही,त्यामुळे सदर व्यक्तीला ही इलायची चहा मध्ये टाकून किंवा सरबत मधून त्याला द्यायची आहे.
हा उपाय केल्यानंतर सात वेलदोडे पांढऱ्या रंगाच्या कागदामध्ये बांधून स्वतःच्या पर्समध्ये तसेच तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. असे केल्याने पैसा तुमच्याकडे खेचला जाईल.याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल फक्त इलायची कुठेही तुटलेली किंवा सडलेली असू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा उपाय कधी करायचा? सदरचा उपाय आपण कधीही करू शकता यासाठी काळ वेळ बघण्याची गरज नाही. सदरचा उपाय शुक्रवारी केल्यास अधिक प्रभावी ठरतो. मात्र तुम्ही ज्या व्यक्तीला कॉईन देणार आहात ती व्यक्ती शुक्रवारी येईलच असे काही नाही.त्यामुळे हा उपाय आपण कधीही करू शकता.मात्र इलायची तिजोरी मध्ये ठेवण्याचा उपाय हा जास्तीत जास्त करून शुक्रवारी किंवा बुधवारी करावा. कारण शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे, तर बुधवार हा श्री नारायणाचा वार असल्याने तुम्हाला धनप्राप्ती होण्याचे संकेत जास्त असतात.
सदर उपाय केल्यानंतर तुम्हाला एका शुक्रवारी फरक न पडल्यास हा उपाय पुढील शुक्रवारी करावा. सदरचा उपाय तीन शुक्रवार पर्यंत केल्यास याचे फळ तुम्हाला नक्की भेटेल.
श्री स्वामी समर्थ