दातातील कीड काढा 5 मिनिटांत बाहेर

आपल्या शरीराचा अविभाज्य घटक हा दात आहे. दाताच्या सौंदर्यावरच आपल्या शरीराच सौंदर्य खुलून दिसतं अस म्हणतात. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे दातांचं सौंदर्य जपणं ही काळाची गरज आहे.ते सौंदर्य आपण कसं जपावं हे आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
दाताचे विकार हे दात व्यवस्थित न घासल्यामुळे किंवा रात्री झोपताना चूळ भरून न झोपल्यामुळे, दातामध्ये जे अन्नाचे कण अडकलेले असतात त्यामुळे खास करून दाताच्या अनेक समस्या निर्माण होतात.दातामध्ये अनेक वेळा अन्नकण अडकल्यामुळे आणि ते तसेच राहिल्यामुळे दात किडतात. तसेच दाढाही किडतात,त्यामुळे दाताच्या विकारांना आपल्याला सामोरे जावे लागते.हे दुखणं हळूहळू करत, इतकं वाढतं की, हे दुखणं असह्य होऊ लागतं. त्यामुळे आपल्याला तो दात किंवा दाढ एक तर काढावी लागते किंवा रूट कॅनल करून घ्यावे लागते. एकदा दात दुखायला लागला की आपल्याला कोणतंच काम सुचत नाही. त्यामुळे एक तर पेन किलर किंवा हायर अँटिबायोटिक घेणं गरजेचं असतं.
आता ही समस्या झाल्यानंतर, आपल्याला डॉक्टर कडे जाण्याआधी काही घरच्या घरी काय उपाय आहेत ते आपण करून ह्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.यासाठी एक घरगुती उपाय आपण सांगणार आहोत,तो आपण केल्यास आपल्याला दाढे मधून किंवा दातामध्ये झालेली जी कीड आहे ती बाहेर कशी काढता येते हे सांगणार आहोत.
या उपायासाठी आपल्याला घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या तीन वस्तू लागणार आहेत.त्यामधील एक आहे तुळशीचे पान, दुसरा पदार्थ आपल्या किचनमध्ये आढळणारा पदार्थ म्हणजे लवंग आहे, तिसरा पदार्थ हळद हा आहे.
हळद अँटीसेप्टिक म्हणून काम करते. हळदीला आयुर्वेदामध्ये विशेष असं महत्त्व आहे.त्यामुळे हळद ही प्रामुख्याने प्रत्येक घरात वापरली जाणारी गोष्ट आहे.
सर्वप्रथम पाच ते सहा लवंगा आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. यानंतर एक तुळशीचे पान घ्यायच आहे. या तुळशीच्या पानावर एक चिमूटभर लवंगाची केलेली जी पूड आहे ती ठेवायची आहे. तसेच एक चिमूटभर हळद या पानावर घ्यायची आहे. तुळशीचे पान,लवंगाची पूड आणि हळद यांची एक गोळी करून घ्यायची आहे.सदर गोळी ज्या ठिकाणी आपला दात दुखत असेल किंवा दात किंवा दात किडले असेल त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचे आहे.
यामुळे काय होणार आहे तर तुळशीच्या पानामुळे आपला जो दात दुखत आहे किंवा दाढ दुखत असेल त्या ठिकाणी तुम्हाला थंडावा मिळणार आहे. तर आपण वापरलेले लवंग आणि हळद यामध्ये असणारे अँटिबॅक्टरियल अँटिसेप्टिक गुणधर्म दातातील कीड बाहेर काढणार आहेत. हे जे मिश्रण आहे ते पाच ते दहा मिनिटे दाढेखाली दाबून ठेवल्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता किंवा थुंकून टाकू शकता. यामुळे कसलाही अपाय होणार नाही.अशाप्रकारे हा उपाय जर तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन वेळा जर केलात, तर तुमच्या दाढेमध्ये असणारी जी कीड आहे किंवा दातामध्ये असणारी कीड आहे ती बाहेर येणार आहे. आणि तुमची दात दुखी थांबणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *