मराठा आरक्षण मागणीसाठी कबनूर मध्ये  चक्काजाम आंदोलन

कबनूर-प्रतिनिधी
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी कबनूर मध्ये रस्त्यावर टायरी पेटवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं”अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी कबनूर मध्ये शनिवार पासून साखळी उपोषण सुरू आहे.याचाच भाग म्हणून बुधवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्ते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात एकत्र आले.यानंतर घोषणा देत कबनूर-कोल्हापूर रस्त्यावर ओढ्यानजीक आले.यानंतर रस्त्यावर  टायरी पेटवून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकारने तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी केली.सुमारे अर्धा तास आंदोलन सुरू होते.त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी दत्ता पाटील,विकास फडतारे, शहाजी भोसले,भिकाजी आपुगडे,सुनील इंगवले,महेश शिवूडकर,यांसह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवाजीनगर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Posted in All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *