कबनूर-प्रतिनिधी
मराठा समाजास आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कबनूर सकल मराठा समाजातर्फे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर सुरु असलेले साखळी उपोषण आज सहाव्या दिवशीही सुरू होते.या आंदोलनास विविध संघटना व समाज बांधव पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले.
उपोषणकर्ते गणेश सुतार व अनिल साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.आजच्या सहाव्या दिवशी अजित खुडे,संजय कट्टी,सतीश पाटील, भिकाजी आपुगडे,किरण कुसाणे,सोनाली आडेकर ,उर्मिला आडेकर,कु.आरती माने,किरण पालकर हे उपोषणाला बसले.
यावेळी प्रा.रवींद्र पाटील,बाळ महाराज,संतोष हत्तीकर,शशिकला इंगवले,मालुबाई सावंत,वैशाली पाटील,सुनिता गोसावी,मधुमती खराडे,नितीन गवळी,त्रिवेणी चौगुले,महेश शिऊडकर,बाबासाहेब कोकणे, अण्णासो निंबाळकर,जयदीप इंगवले, दत्तात्रय पाटील,रवींद्र धनगर,विद्यासागर चराटे,प्रज्योत चौगुले,अनिकेत तालुगडे,विलास पाटील,स्वप्निल जाधव, निखिल जाधव,संदेश जाधव आदी उपस्थित होते.भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली पाटील यांनी पाठिंबा दिला.