सांगली-प्रतिनिधी
सांगलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर थाटलेल्या छोट्या-मोठ्या स्टॉल धारकांना पळापळ करावी लागत आहे.तर अवकाळी पावसाने ऊसतोड लांबणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला कारखान्याला ऊस जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पावसाळ्यात पाऊस कमी बरसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.सध्या ऊस हंगाम सुरू होणार असून ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत.मात्र या अवकाळी पावसामुळे ऊस तोडीवर देखील परिणाम होणार आहे.तर अचानक बरसलेल्या पावसामुळे विद्यार्थी वर्गाचीची तारांबळ उडाली आहे.