इचलकरंजी-प्रतिनिधी
इंडीया बुक रेकॉर्ड ने देशातील पत्रकारांची नंबर वन संघटना म्हणून गौरविलेल्या व्हॉईस ऑफ मिडीया या देशव्यापी पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर ( ग्रामीण ) जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर इचलकरंजी शहराध्यक्षपदी साईनाथ जाधव यांची निवड करणेत आली.संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अजित कुंकुलोळ यांनी या निवडीची घोषणा केली. यावेळी पश्चिम महराष्ट्र अध्यक्ष व सांगलीचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते उपस्थित होते.

संघटनेच्या उपाध्यक्षदी महेश आंबेकर, रविकिरण चौगुले यांची तर बाळासाहेब पाटील (सरचिटणीस), शितल पाटील (चिटणीस)पदी नियुक्ती करणेत आली. या बैठकीस विजय तोडकर, निखिल भिसे, अजित लटके, अमित काकडे, संतोष काटकर, दर्शन फडतारे, अक्षय पोवार, शहाहुसेन मुल्ला,टिपू सनदी आदि पत्रकार उपस्थित होते.