आजचा स्वामी संदेश

श्री स्वामी समर्थ.

स्वामी म्हणतात बाळा तुला जे हवे ये मी कधीच देत नाही, पण तुझ्यासाठी जे चांगले आहे ते मी देतो.कारण तू फक्त आजचा विचार करून मागतोस पण मी तुला आयुष्यभर पुरेल अशीच गोष्ट देतो.

या जगात भौतिक सुखासाठी अनेक जण दुःखी आहेत.आधी घर मागतील,नंतर नोकरी मागतील,नंतर लग्न व्हावे म्हणतील.नंतर मुलांची इच्छा.परत चार चाकी गाडी मागतील.पण मागण्या काही संपत नाहीत.केवळ हाव करत राहतात.एखादी इच्छा पूर्ण नाही झाली की नाराज होतात.

सुखी जीवन असताना भौतिक गोष्टीसाठी स्वतःला दुःख देतात.अन परत स्वामींच्याकडे येतात.म्हणून स्वामी म्हणतात गरजा कमी ठेवा.तुम्ही नक्की आनंदी व्हाल.सुख मिळाले तरी हुरळून जाऊ नका,दुःख मिळाले तरी खचून जाऊ नका.जे काय करतील ते स्वामी करतील असा विश्वास ठेवा,स्वामी नक्कीच तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *