एक वस्तू ज्यामुळे तुमचं “पॉकेट” नेहमी भरून राहील

नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ

ही एक वस्तू आपल्या पाकिटमध्ये ठेवल्यास तुम्हाला पैशाची कधीच चणचण भासणार नाही. यासाठी ही गोष्ट नक्की करा तुमचं पाकीट कधीही रिकामं राहणार नाही. नेहमीच ते पैशाने भरलेलं राहील. प्रत्येकाला वाटत असते की आपल्या पॉकेटमध्ये पैसा असावा, पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याचच पॉकेट नेहमी भरलेल असतं.मात्र पाकीट भरलेलं राहण्यासाठी काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत.

पाकिटात पैसे असतील तर आपलं मन नेहमी प्रसन्न असतं. पण पाकिटात जर आपल्या पैसे नसतील तर आपलं मन नेहमी दुःखी असतं. याचाच परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यभर आपल्या बॉडी लॅंग्वेज वर होतो.व आपण चिंताग्रस्त वाटतो.
आज आपण असे काही उपाय बघणार आहोत की, ज्यामुळे आपल्या पॉकेटमध्ये नेहमी पैसे राहतील.

आपल्या पाकिटात पैसे राहण्यासाठी पहिला उपाय म्हणजे, आपल्या घरातील तांदळाच्या डब्यातील 21 तांदूळ, एका कागदामध्ये बांधून ती पुडी आपल्या पाकिटात ठेवा. यामुळे असं होईल की, ज्याप्रमाणे धान्य कणाकणाने वाढते, एक बीच हजारो बीजांना जन्म देते, त्याप्रमाणे ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या पाकिटात राहून तुमचं पाकीट नेहमी भरलेलं राहील..

दुसरा उपाय म्हणजे पिंपळाचे पान ज आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे. हा एकदम छोटासा उपाय आहे पण यामुळे तुमचा पैसा ,तुमच्या पाकिटामध्ये नेहमी भरलेला राहील.

तिसरा उपाय म्हणजे पाकिटात एक रुद्राक्ष ठेवावा. रुद्राक्ष ठेवल्यावर आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते. त्यामुळे रुद्राक्ष ठेवणे पाकिटामध्ये कधीही भाग्यकारक मानले जाते.
पाकिटात एखादा छोटासा मोरपंख ठेवला तरी मोर पंखाची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती त्या पाकिटामध्ये राहून तुम्हाला चांगले अनुभव येऊ शकतात.

एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या जवळच्या माणसाकडून तुम्हाला बक्षीस रुपी मिळालेले पैसे, तुम्ही पाकिटात ठेवा. यामुळे नवीन पैसा येण्यास मदत होते. अट्रॅक्शन पॉवर प्रमाणे पैसा तुमच्याकडे नेहमी खेचला जातो.त्यामुळे तुमचं पाकीट नेहमी पैशाने भरलेलं दिसेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्याकडे असलेले पैसे हे कोणत्याही प्रकारे घडी घालून अथवा चूरगळलेल्या स्वरूपात असू नयेत. कारण पैशाला आपण लक्ष्मी मानतो. आणि अशा लक्ष्मीचा आपण अवमान करू नये. त्यामुळे तुम्ही पैसे ठेवताना व्यवस्थित पाकिटामध्ये ठेवले तर ,सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तुमच्या पाकिटमध्ये पैसा नेहमी शिल्लक राहील.एखादा किन्नर व्यक्तीकडून तुम्ही एखादा कॉईन, पाच रुपये किंवा दहा रुपये त्याच्याकडून घेऊन तुम्ही जर तुमच्या पाकिटामध्ये ठेवला तर तोही चांगला परिणाम देऊन जातो..

सदर माहिती विविध स्रोताद्वारे एकत्रित केली असून याद्वारे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही.हे सर्व उपाय आपल्या श्रद्धेचा भाग म्हणून सांगितले आहेत.पुराणकालीन, ज्योतिष शास्त्रीय माहिती व्हावी यासाठी हा लेख आहे.सकारात्मक ऊर्जेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी काही जे उपाय आहेत ते सांगितले आहेत.याचा कोणीही अंधश्रद्धा म्हणून वापर करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *