बायकोकडून नवऱ्याच्या 7 अपेक्षा

woman and man holding balloon together

आजकाल जीवन जगत असताना बघतो की, प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येकालाच वाटते की समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं. समोरच्या व्यक्तीने आपल्या गरजा पूर्ण कराव्यात. आपल्या मनाप्रमाणे वागाव असं प्रत्येकालाच वाटत असतं.

लग्नापूर्वी आपल्या प्रेयसीने कसं वागावं,आपल्या मैत्रिणीने आपल्या सोबत कसं वागावं हे प्रश्न असतात. मात्र लग्नानंतर आपल्या बायकोने आपल्याशी कसं वागावं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाला असतो. कारण प्रत्येक नवऱ्याच्या आपल्या बायकोकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते….त्यामुळे बायकोकडून नवरे कोणत्या अपेक्षा करतात हे जाणून घेऊया.

प्रत्येक नवरा बायको मध्ये भांडण नेहमी ठरलेले असते. पण नवरा आणि मांजर काही झालं तरी शेवटी घरीच येणार असे म्हटले जाते. कारण भांडण काही क्षणाचं असतं. भांडणात देखील प्रेम दडलेलं असतं.
नवरा कुटुंबाचा कणा असतो.तर त्याबायको घराची लक्ष्मी असते.आता बायकोकडून कोणत्या अपेक्षा असतात हे आपण बघूया…

नात्यामध्ये मोकळीकता असावी
प्रत्येक नवऱ्याला वाटते की आपल्याला नात्यांमध्ये मोकळीक असावी.स्वातंत्र्य असावे कारण आई-वडिलांना वाटते की मुलगा आपल्याजवळ असला पाहिजे त्याने आपल ऐकले पाहिजे तर, पत्नीला वाटते की नवऱ्याने आपले ऐकले पाहिजे. त्यामुळे या दोघांच्या वादात नवऱ्याचे खूप हाल होतात. त्यामुळे पत्नीने नवऱ्याला समजून घेणे गरजेचे आहे.

नवऱ्यावर संशय घेऊ नये
कधी कधी मनमोकळेपणा,जवळचे असलेले नातेसंबंध कधीकधी आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. यावेळी पत्नीने नवऱ्यावर संशय घेऊ नये असे पतीला वाटते. त्यामुळे पत्नीने समोर काय दिसते यावरून काही तर्क न लावता त्या गोष्टीच्या खोलाशी जाऊन, त्या नात्यांमधील वास्तविकता समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास वाद होणार नाही.

नवऱ्याला रिस्पेक्ट द्यावा.
प्रत्येक नवऱ्याची हीच अपेक्षा असते की, नवऱ्याला बायकोने रिस्पेक्ट द्यावा.पण काही वेळा काही बायका काही कालावधीनंतर नवऱ्याला आदर देणे कमी करतात, त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. हेच कारण नवरा बायको मध्ये अंतर पाडते. त्यामुळे नवऱ्याला आदर देने गरजेचे आहे.

घरातले भांडण बाहेर आणू नका
नवरा बायकोचे भांडण नवरा बायको मध्ये ठेवावे.जेणेकरून ते भांडण सर्वांसमोर आल्यामुळे त्याचा इतर लोक फायदा घेतील आणि त्यामुळे नवरा बायको मध्ये विश्वास कमी होऊन,विश्वास संपण्याची भीती असते. त्यामुळे दोघांमधील गोष्टी दोघांमध्येच रहाव्यात हीच अपेक्षा बायकोकडून असते.

सिक्रेट गोष्टी
आपल्या नात्यांमधील किंवा आपल्या घरातील काही सिक्रेट गोष्टी आपल्यामध्येच राहाव्यात.त्या कोणाशी शेअर करू नये अशी मुख्यत्वे नवऱ्याची अपेक्षा असते..

Stylish असावी
बायकोने बाहेर जाताना stylishरहावे.जेणेकरून इतर लोकांसमोर आपली प्रतिमा चांगली राहील. तसेच सर्वांशी मिळते जुळते घेणारी, व खुलेपणाने बोलणारी बायको असावी असे प्रत्येकाला वाटते.

गर्व नसावा
आपल्या सौंदर्याचा किंवा शिक्षणाचा गर्व न करणारी बायको असावी असे प्रत्येकाला वाटते. कारण पैसा आला की काहीजण नवऱ्याला किंमत देत नाहीत. तर काहीजण सौंदर्यामुळे आपल्या नवऱ्याला कमी लेखतात. त्यामुळे बायकोने आपल्याला कमी लेखू नये अशी नवऱ्याची प्रामुख्याने अपेक्षा असते.

एकंदरीत नवरा आणि बायको ही एका रथाची दोन चाके आहेत, ती व्यवस्थित जर चालली तर आयुष्याचा रथ व्यवस्थित मार्गक्रमण करू शकतो. त्यामुळे दोघांनीही समजून घेऊन जीवन प्रवास करणे गरजेचे आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *