आजचे पंचाग
वार-शनिवार
दिनांक-24 सप्टेंबर2022
शक-1944
ऋतू-वर्षा
मास-भाद्रपद
पक्ष-कृष्ण
तिथी-चतुर्दशी
नक्षत्र-पूर्वा
सूर्योदय-6.27
सूर्यास्त-6.33
राशिभविष्य
शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2022
मेष रास
मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यश मिळेल. मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल.घरात आनंदाचे वातावरण राहील, मात्र तुम्ही आज शांत रहा शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
वृषभ रास
आज वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातममी मिळू शकते. जेष्ठ लोकांचा आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे. त्यामुळे अचानक खर्च उद्भवू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस भाग्यकारक असून ,आज तुमच्या व्यवसायात भरभराट होणार आहे.राजकीय सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल पण तुम्ही सावधानतेने चाला.
कर्क रास
आज कर्क राशीच्या लोकांसाठी आनंदी दिवस आहे. तुमच्याकडून आज मनोरंजनाचे प्लॅन केले जातील. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका.प्रेमात यश मिळेल.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांचा हट्टीपणा त्यांना अडचणीत आणू शकतो. त्यामुळे हट्टीपण टाळा. वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमचे खर्च वाढू शकतात. तुमचा स्वभाव बदला ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या मंडळींची रखडलेली कामे आज पूर्ण होतील. नवीन खरेदी करण्याचा योग आहे.पण यासाठी नियोजन आवश्यक आहे. आजच्या खर्चाचा परिणाम पुढे होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक.
तूळ रास
तू राशीने योजना केलेले काम आज पूर्णत्वास जाईल. नवीन कामाला नियोजन करूनच हात घालावा. एखादी दुःखकारक गोष्ट समजेल, त्यामुळे तुम्ही उदास रहाल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. प्रत्येकाशी नम्रतेने वागा अन्यथा वाद होऊ शकतात.तुमचा दिवस धार्मिक कामात निघून जाईल.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्यांचा दिवस देवकार्यात जाणार आहे. व्यवसायासाठी अनुकूल दिवस आहे. यासाठी तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल.
मकर रास
फार महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. परदेशातील काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक व्यवहार सावधानपूर्वक करावेत.
कुंभ रास
कुंभ राशीच्या व्यक्तींना आज समाजात मानसन्मान मिळेल. तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. मात्र आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्या चुकीच्या शब्दाने एखाद्याचे मन दुखवू नका.
मीन रास
तुमच्या चांगल्या स्वभावामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही प्रयत्न करत असलेल्या कामात यश मिळेल. व्यवसाय करण्यासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल नाही.