स्पर्धेच्या युगात विद्यार्थी घडवणारा ज्ञान ऊर्जा प्रकल्प कौतुकास्पद-मुख्याध्यापक दळवी-पाटील

सांगली/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी,त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी ज्ञान ऊर्जा प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण उपक्रम कौतुकास्पद असून भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होईल.स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात या कौशल्यांचा वापर करावा असे प्रतिपादन मुख्याध्यापक ए. एस.दळवी -पाटील यांनी केले.ते कसबे डिग्रज येथील प्राथमिक आश्रमशाळा येथे ,इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत,नॅशनल मॅनेजमेंट ट्रेंनिग इन्स्टिट्यूट यांच्यावतीने,ज्ञान ऊर्जा प्रकल्प अंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेच्या बक्षीस वितरण समारंभ व किट वितरण कार्यक्रमात बोलत होते.

स्वागत एस.ए. पाटील यांनी केले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना किट व बक्षीस वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करून,या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असे मत मांडले.इयत्ता 7वी व 8वी च्या विदयार्थ्यांना सुमारे 11 मॉड्यूल च्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले गेले.यामध्ये प्रात्यक्षिक करून विषय समजावण्यात आले हे विशेष.

यावेळी शिक्षक एस.एस.खोत,डी.व्ही.भोसले,एस.ए. पाटील,एस.बी.गुरव,सौ.एस.व्ही.शिंदे,सौ.आर.एस.खोत,ट्रेनर अजित लटके यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *