श्री शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा १२% लाभांश जाहीर चेअरमन मिलींद कोले–पतसंस्थेची ४० वी वार्षिक सभा खेळीमेळीत

कबनूर-प्रतिनिधी
रौप्य महोत्सवी श्री शांतीनाथ पतसंस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मिलींद कोले यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतीक भवन दिगंबर जैन मंदीर येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.

प्रास्तावीक व स्वागत मॅनेजर चंदूलाल फकीर यांनी केले.त्यानंतर मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन झाले.तद्नंतर संस्थेचे ज्ञात अज्ञात सभासद, विविध कारणामुळे निधन झालेले देशातील नागरीकाना सभेत श्रध्दाजंली वाहण्यात आली.त्यानंतर मॅनेजर चंदुलाल फकीर यांनी नोटीसीवरील सर्व विषयांचे वाचन केले.त्या सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.

संस्थेचे चेअरमन मिलींद कोले यांनी संस्थेचा अहवाल, नफा तोटा व ताळेबंद याचे वाचन केले व अहवाल सालात संस्थेची उलाढाल १८ कोटीची झाली आहे. खेळते भांडवल ९ कोटी ८५ लाख इतके झाले असून तरतुदी वजा जाता अहवाल सालात संस्थेस निव्वळ नफा १२ लाख ६ हजार झालेला आहे.संचालक निर्णप्रमाणे या वर्षीसुध्दा सभासदांना १२ % डिव्हीडंड देणार असल्याचे जाहीर केले.

सामाजीक कार्य म्हणून संस्थेने कबनूर येथे ५० तयार झाडांचे वृक्षारोपण करुन निर्सगाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला असलेबद्दल सांगुन ग्राहकाभिमुख पारदर्शी व्यवहार व संस्थेवरील खातेदारांचा अटळ विश्वासाच्या जोरावर
संस्थेने प्रगती केले असलेने या पुढेही आपल्या विश्वासाच्या जोरावर संस्था उत्तुंग भरारी घेईल असे सभेप्रसंगी ग्वाही दिली.

त्यानंतर संस्थापक डॉ. सुधाकरराव मणेरे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत
असताना संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचाही उहापोह केला.संस्था स्थापनेपासुन गेली ४० वर्षे संस्था
नफयात सुरु असल्याचे पाहायला मिळते हे माझे भाग्य समजतो असे म्हणाले.यानंतर विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल तसेच गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर सभेस व्हा. चेअरमन सुभाष केटकाळे, संचालक रमेश केटकाळे, बाळासो केटकाळे,ज्ञानदेव बडवे, किरण कांबळे,नजरुद्दीन मुजावर, आनंदा कदम,राजेंद्र शेटे,सुरेखा सुरेश केटकाळे,सिमा लिगाडे, डॉ. मिता पाटील,संगिता पाटील,संजय केटकाळे, मधुकर मणेरे, महावीर केटकाळे,राजाराम वाकरेकर, विलास कुंभार,महावीर पिंपळे यांच्यासह कर्मचारी धंनजय कोले, अशोक केटकाळे,अनिल हजारे, शिवम कोळेकर व सभासद उपस्थित होते.किरण कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *