कबनूर/प्रतिनिधी
कबनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताराराणी आघाडीच्या सौ.सुलोचना संजय कट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्षस्थानी प्रभारी सरपंच सुधीर लिगाडे होते.

शुक्रवारी झालेल्या विशेष बैठकीत सौ.सुलोचना कट्टी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.यावेळी एकूण 15 सदस्य उपस्थित होते.दरम्यान एकमेव कट्टी यांचा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आर.बी.बावणे यांनी जाहीर केले.
वैशाली कदम किंगमेकर
कबनूर ग्रामपंचायतीत ग्रामस्थ आघाडीची सत्ता होती. मात्र उपसरपंच निवडणुकीत बहुमत असताना देखील ताराराणी आघाडीचा उप सरपंच झाला. यावेळी खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली.यानंतर ग्रामस्थ आघाडीच्या सरपंच शोभा पोवार यांनी ताराराणी आघाडीत प्रवेश करून ग्रामस्थ आघाडीला धक्का दिला होता.यानंतर सौ कट्टी यांना सरपंच करण्यासाठी वैशाली कदम यांनी जोरदार यंत्रणा लावली होती.त्यामुळे त्या या घडामोडीत किंगमेकर ठरल्या.
सरपंच पदासाठी संघर्ष
सरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सरपंच पदी सौ सुलोचना कट्टी यांना संधी देण्याची मागणी वारंवार होत होती.यावेळी शिष्टमंडळाने नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मात्र ग्रामस्थ आघाडीच्या नेत्यांनी सरपंच पोवार ऐकत नसल्याचे सांगून हात वर केले होते.यानंतर अखेर कट्टी यांनी आमदार आवाडे यांची भेट घेत ताराराणी आघाडीत प्रवेश केला होता.यावेळी आमदार प्रकाश आवाडे,डॉ.राहुल आवाडे यांनी सरपंच करण्याचा शब्द सौ कट्टी यांना दिला होता.

आवाडेंनी शब्द पाळला
सौ सुलोचना कट्टी यांना सरपंच करण्याचा शब्द आवाडे यांनी दिला होता.अखेर कट्टी यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने आमदार आवाडेंनी शब्द पाळला, त्यामुळे त्यांचे गावातून कौतुक होत आहे.
नूतन सरपंच निवडीनंतर सौ सुलोचना कट्टी यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, मौश्मी आवाडे,बी.डी.पाटील,प्रमोद पाटील, सुधाकरराव मणेरे,अशोक पाटील,यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यानंतर ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली.तसेच जेसीबी मधून गुलालाची उधळण करण्यात आली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे,ग्रा.पं. सदस्य सुनील काडाप्पा,अर्चना पाटील,स्वाती काडाप्पा,सुनीता आडके,वैशाली कदम,मधुकर मणेरे,शोभा पोवार,सुधीर पाटील,सैफ मुजावर,सुधाराणी पाटील,रोहिणी स्वामी,रजनी गुरव,समीर जमादार,यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ.सुलोचना कट्टी यांना सरपंच पद मिळेपर्यंत चप्पल न घालण्याचा पण त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी यांनी केला होता.काल त्यांनी चप्पल घालून आपला पण पूर्ण केला.