कबनूर- online24taas
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि,हुपरी यांच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे सभासद व शेतकरी वर्गासाठी हितगुज दौरा केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी ऊस विषयक प्रश्नांवर शेतकरी वर्ग व सभासदांशी चर्चा करण्यात आली.यावेळी जवाहर साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती,पुरवण्यात येणारी बी बियाणे,ऊसाची रोपे आदीबाबत चर्चा करण्यात आली.तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची ग्वाही देण्यात आली.

यावेळी संचालक बबन केटकाळे, जिनगोंडा पाटील,अण्णासो गोटखिंडे,आदगोंडा पाटील,अभय काश्मिरे, शेती अधिकारी किरण कांबळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मिलिंद कोले,विकास सोसायटी चेअरमन अनिल पाटील,जयकुमार काडाप्पा,प्रदीप मणेरे,शिवगोंडा पाटील,निशिकांत पाटील,जितेंद्र पाटील,मधुकर मणेरे,रवींद्र झोले,राजू शिरगुप्पे,महावीर लिगाडे,संजय केटकाळे,प्रकाश केटकाळे,सुधाकर महाडिक यांच्यासह कारखान्याचे सभासद शेतकरी उपस्थित होते.आभार माजी उपसरपंच निलेश पाटील यांनी मानले.