कबनूरचा कायापालट करण्यासाठी विठ्ठल चोपडेना आमदार करा-अशोक पाटील

कबनूर-प्रतिनिधी
इचलकरंजी मतदार संघातील पाणी प्रश्न गंभीर आहे.गेली 40 वर्षे सत्तेत असूनही ज्यांना मूलभूत नागरी समस्याही सोडवता आलेल्या नाहीत,ते पुन्हा निवडून द्या म्हणत आहेत.स्वतःची खुर्ची सांभाळण्यात धन्यता मानणाऱ्याना ओळखण्याची वेळ आली असून,भूलथापांना बळी न पडता “शिट्टी” या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी कबनूर मधील विजयी सभेत केले.अध्यक्षस्थानी डी. एस.पाटील होते.

व्याजासाठी गोरगरिबांची लुबाडणूक
एक उमेदवार व्याजाचे पैसे घेऊन गोरगरिबांना लुबाडत आहे,तो निवडून द्या म्हणत आहे हे दुर्दैव आहे.कबनूर मध्ये पाईपा घातल्या आहेत पण टाकीचा पत्ता नाही.जलजीवन योजनेचा मलिदा खाण्यासाठीच योजना आणली असल्याचा गंभीर आरोप राहुल कांबळे यांनी केला.स्वागत प्रास्ताविक राहुल कांबळे यांनी केले.तर कार्यक्रमाची सुरुवात तेजस देसाई व सहकाऱ्यांनी गोंधळ घालून करण्यात आली.

कबनूरच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ
यावेळी बोलताना लिंगायत समाज अध्यक्ष अशोक पाटील म्हणाले,कबनूरच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला असून विद्यमान आमदारांना कबनूर चौकातील वाहतूक कोंडी फोडता आलेली नाही.2-2 तास लोकांना ताटकळत थांबावे लागते.कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. वर्ग 2 जमिनीचा प्रश्न प्रलंबीत आहे.गावात या6-7 दिवसांनी पाणी येते.केवळ आश्वासन देण्या पलीकडे काहीच झालेले नाही.त्यामुळे आता बदल घडवण्यासाठी विठ्ठल चोपडे हे सक्षम पर्याय म्हणून आहेत.त्यांना विजयी करावे.

यावेळी माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे,किरण सुतार,राजू भडंगे,विलास सुतार आदींनी भाषणे केली.यावेळी अनिल पाटील,बबन इंगळे,निशिकांत पाटील, मालन माने,इम्रान सनदी,राजू सुतार,दगडू कुंभार,कबीर हजारी,किरण माने यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *