जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा उत्साहात संपन्न

पट्टणकोडोली- Online24taas team
जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा पट्टणकोडोली येथे भक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नानिजधाम,कोल्हापूर जिल्हा सेवा समिती,यांचेवतीने पादुका दर्शन व प्रवचन सोहळा व सामाजिक उपक्रम कार्यक्रम येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिर,भंडारखाना येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी भाविकांनी गुरुपूजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सकाळी पट्टणकोडोली गावामधून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या शोभायात्रेमध्ये  हलगी पथक,कलशधारी  महिला,निशानधारी पुरुष,जगद्गुरु माऊलींच्या सिद्ध पादुका रथ,भजनी मंडळ तसेच भक्तगण समाविष्ट झाले होते.सदर मिरवणूक मंडपामध्ये आल्यानंतर गुरुपूजन करण्यात आले.यानंतर सामाजिक उपक्रमा अंतर्गत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.तसेच प्रवचन व उपासक दीक्षा हे कार्यक्रम संपन्न झाले.त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी इंडोकाउंट इंडस्ट्रीजचे व्हाईस प्रेसिडेंट सतीश भुतडा,संस्थानचे ट्रस्टी अभिजित अवसरे,उद्योगपती विकास जाधव,जयश्री रवीकुमार,विठ्ठल बिरदेव देवस्थान समितीचे विठ्ठल पुजारी,शंकर भानसे,नवला पुजारी,दादासो बाळाई,प्रशांत गावडे यांसह पदाधिकारी,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Posted in All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *