Tula badabada badvin lyrics तुला बदाबदा बडवीन ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडवीन

नादी लागू नको माझ्या,तुला चांगलाच रडवीन
नादी लागू नको माझ्या
तुला चांगलाच रडवीन
ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडवीन
ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडवीन ||धृ||

उगीच मला तू रं खवळल कशाला,
बोंबा मारून ताण देऊ नकोतू घशाला
तुला अद्दल घडविण,तुला अद्दल घडविण ||1||

आरं हाय का ताल सूर, गाणं म्हणतो हलगी वर
तुझा काढीन जाळ धूर,तुझ्या जिंदगीवर थुरं
अंगाचं काढीन चमडं, या ढोलकीला मढविन ||2||

कळीचा तूरे बेट्या आहेस नारदमुनी,
बाळूचं नाव घेता होतो पाणी पाणी
चार अन्या सारखा,तुला हवेत उडवीन ||3||

ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडवीन

गीतकार – तीर्थ शिंदे
संगीत/गायक – बाळू शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *