आयुष्यात या 3 गोष्टी कोणालाच सांगू नका -चाणक्यनीति

मित्रांनो नमस्कार
चाणक्य नीतिला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण चाणक्यनीति मधील अनेक गोष्टी, ट्रिक्स आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप उपयोगी पडतात.


आपण सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात. तसेच राजकीय जीवन जगत असतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
तुम्ही एखाद्या उच्च पदावर गेला तरी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो.तुम्ही उच्च पदापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो,मात्र तुमच्या अडचणी काही संपत नाहीत.कारण तुम्ही अडचणी आल्यावर एक सामान्य माणूस म्हणूनच विचार करता. मात्र तुम्ही व्यवहारीक दृष्ट्या तर्कशुद्ध विचार करून दूरदृष्टीने निर्णय घेतल्यास तुमचे निर्णय शंभर टक्के चुकणार नाहीत.अशाच चाणक्य नीतीच्या तीन गोष्टी आपण पाहणार आहोत ज्यामध्ये, आपल्या जीवनाचे सार दडलेले आहे.

सीक्रेट
आपल्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्रेट. तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर किंवा,तुम्हाला त्या मधून धनप्राप्ती झाल्यानंतर ती आपण कोणालाही शेअर करू नये.
तुम्ही एखादा उद्योग सुरू करत असाल, किंवा उद्योग चालू केला असेल,तर त्या उद्योगातील बारीक-सारीक गोष्टी असतील किंवा काही सिक्रेट असतील ते कधीच कोणाशी शेअर करू नका. कारण आजचा मित्र तुमचा भविष्यात शत्रूही बनू शकतो आणि ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही व्यवसायाशी संबंधित गोष्ट सिक्रेट न ठेवल्यास तुमच्या व्यवसायावरच गंडा तर येऊ शकते.त्यामुळे सिक्रेट गोष्टी नेहमी सिक्रेट ठेवाव्यात.तुमच्या घरगुती काही गोष्टी असतील त्या कोणाशीच कधीही शेअर करू नका. कारण याच गोष्टीचा समोरचा व्यक्ती कधी गैरफायदा घेईल आणि त्यातून तुमचे नुकसान होईल हे सांगता येत नाही.त्यामुळे तुमच्या घरातील सिक्रेट गोष्टी या घरामध्येच ठेवा.तसेच नात्यांमध्ये असणारे काही संबंध असतील किंवा मैत्री असेल ती तुमच्यापर्यंत सिमीत ठेवा, त्याची इतरत्र वाच्छता करू नका. कारण लोक त्यांच्या परीने त्याचा अर्थ काढत असतात त्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी सिक्रेटच ठेवा.

ध्येय
प्रत्येक व्यक्तीला जन्मजात काही-ना काही देणगी देवाने दिलेली असते. ज्याने त्याचा माग काढला तो आयुष्यात सक्सेस झालाच म्हणून समजा. एखाद्याला सुंदर आवाज दिलेला असतो, एखाद्याला सुंदर चित्रकला काढण्याची कला दिलेली असते, तर एखाद्याला पोहण्याची कला दिलेली असते, तर कोणाला धावण्याची कला दिलेली असते. प्रत्येकाचे जन्मजात गुण वेगवेगळे असतात. मात्र जो त्या कलेमध्ये तरबेज होतो, त्या कलेचा शोध घेतो तो, जीवनात यशस्वी होतोच.
तुम्ही एखादी गोष्ट करताना इतरांना कधीच सांगण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही बघत असलेले स्वप्न, इतरांना केवळ चेष्टा वाटू शकते. कारण तुमची विचार करण्याची क्षमता ही, समोरच्या व्यक्तींची विचार करण्याच्या क्षमते एवढी असेल असे नाही. त्यामुळे तुमच्या ध्येयापासून ती व्यक्ती तुम्हाला विचलित करू शकते. त्यामुळे तुमचे ध्येय कधीच कोणाला सांगू नका. ते तुमच्या हृदयामध्ये बिंबवून ठेवा.व त्याचा पाठलाग करून , फक्त ते ध्येय पूर्ण करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करा.ज्या दिवशी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचाल तो तुमच्या आयुष्यातील इतिहास असेल. त्यामुळे ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुमच्या ध्येयाची चर्चा करू नका.

केलेले काम किंवा दिलेले दान
तुम्ही एखाद्याच्या चांगल्या किंवा वाईट काळात एखाद्याला साथ दिली असेल किंवा त्याच्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही सहभागी होत असाल, ही गोष्ट जरी चांगली असली तरी,तुम्ही ही गोष्ट कधीही कोणाला बोलून दाखवू नका.कारण त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाची किंमत कमी होते.किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट स्वार्थासाठी काम करत आहात का? असे समजले जाते. त्यामुळे तुम्ही निस्वार्थपणे केलेल्या कामाला काहीच किंमत उरत नाही.ज्याप्रमाणे तुम्ही एखादे केलेले काम कोणाला सांगू नका.त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याला दिलेले दान कधीच सांगू नका. कारण तो विश्वविधाता ब्रम्हांडनायक तुम्हाला एखादी गोष्ट देताना कधीच गाजावाजा करत नाही किंवा कधीच त्याचं औडंबर माजवत नाही. त्यामुळे तुम्हीही एखाद्याला दिलेले दान कधीच कोणाला सांगू नका. हे दान म्हणजे गुपित प्रकारचे असेल तर त्याचा तुम्हाला लाभ होईल.
जीवनात यशस्वी होण्यासाठी या तीन गोष्टी पाळल्यास तुम्ही खुप प्रगती करू शकता.


अशा नवनवीन पोस्ट साठी आमच्या वेबसाईट ला आवर्जून भेट द्या.
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *