कबनूर – प्रतिनिधी
कबनूर (ता. हातकणंगले) येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून,कबनूर चंदूर रोडवरील फरांडे मळ्यानजीक,आरसीसी गटर करणे कामाचा शुभारंभ आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

येथील कबनूर चंदूर रोडवरील फरांडे मळ्यानजीक मुख्य रस्त्यावर सांडपाणी साठून रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.याबाबत ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे समीर जमादार व नागरिकांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे याठिकाणी आरसीसी गटर करण्याची मागणी केली होती व वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
यावेळी आमदार आवाडे यांनी तात्काळ लक्ष घालत 25 लाखाचा निधी मंजूर केला.यामुळे भागातील सांडपाण्याचा सुमारे 25 वर्षापासूनचा प्रश्न निकाली निघाला आहे.त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्या विजयाताई पाटील,अशोक पाटील,मिलिंद कोले,सुधाकरराव मणेरे,बी.डी.पाटील,प्रमोद पाटील,निलेश पाटील,सरपंच शोभा पोवार,ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे,समीर जमादार,भैया जाधव,अर्चना पाटील,वैशाली कदम,स्वाती काडाप्पा,रजनी गुरव,गुंडू मणेरे,जयकुमार काडाप्पा,सचिन सुतार,यांसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
