योगासन स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे यश

इचलकरंजी/शैलेंद्र चव्हाण

आंतरराष्ट्रीय योगदिन व देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्हा गुरूप्रसाद योग परिषद, इचलकरंजी यांनी योगासन स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

शर्वरी माळी

या स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी यश संपादन केले. जिल्हास्तरावर झालेल्या या स्पर्धेमध्ये 8 ते 14 वर्षे वयोगटामध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शर्वरी शाम माळी इ. 9 वी क हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर 14 ते 17 वर्षे वयोगटामध्ये कु. हर्षदा संदिप करंबेळकर इ. 10 ब हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

Advertise

यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शहा, क्रीडाशिक्षक आर. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.


या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर श्री राजगोपाल डाळ्या,ऑनररी सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *