वाहतुक समस्या,अर्धवट गटारी बाबत त्वरित कार्यवाही करा-इनाम

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
इचलकरंजी शहरातील विविध समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी याबाबत इचलकरंजी नागरिक मंचतर्फे प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना निवेदन देण्यात आले.

इचलकरंजी शहरातील पंचवटी टॉकीज ते तीन बत्ती चार रस्ता चौक येथे व थोरात चौक ते कापड मार्केट व राजीव गांधी भवन परिसरात ट्रक लावलेले असतात त्यामुळे वाहतुक कोंडी होते व अपघात होत असतात त्यामुळे इचलकरंजी शहराच्या वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने ट्रक पार्किंग साठी इतरत्र सोय करावी व ट्रक टर्मिनलसाठी तातडीने प्रयत्न करून वाहतूक कोंडी सोडवावी.

Advertise

मंगळवार व शुक्रवार आठवडा बाजारावेळी आवाडे टॉकीजसमोरून अवजड वाहतूक बंद करून रिंग रोड मार्गे करण्यात यावी.सुतार मळा येथे सुरू असलेले डांबरीकरण काम अतिशय निकृष्ट व अपूर्ण असून त्याची चौकशी करण्यात यावी.सांगली रस्ता डिपीला दाखवल्याप्रमाणे मोठा व्हावा ही नागरिकांची मागणी असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नाहीत या झाल्यास पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी घुसते ते थांबेल.

Advertise

बिशप इंग्लिश स्कुल ते आरगे भवन रोड या ठिकाणी अर्धवट गटार केलेली असून सदर गटार कोणत्या मक्तेदाराने केलेली आहे तसेच तेथील इंजिनियर कोण यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.वंदे मातरम क्रीडांगण समोरील बाजूस शाळा असल्याने वाहतूक जास्त आहे. सदर भागात स्पीडब्रेकर करण्याची मागणी वारंवार झालेली असून सदर भागात प्लॅस्टिक स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत.राजर्षि छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ कंपौडमध्ये नागरिक रात्री खाद्यपदार्थ खाऊन कचरा करतात तेथे सुरक्षारक्षक नेमून काळजी घेण्यात यावी.

Advertise

याबाबत केतन गुजर यांनी तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.यावेळी इनामचे राजु कोन्नुर,राम आडकी,उदयसिंह निंबाळकर,संजय डाके,महेंद्र जाधव,लक्ष्मण पाटील,दीपक अग्रवाल,डॉ सुप्रिया माने,कल्पना माळी, अभिजित पटवा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *