लम्पी व्हायरसचा धुमाकूळ,पशुपालक चिंतेत..

लम्पी व्हायरस पसरतो कसा? लक्षणे कोणती? जनावरांची घ्यावयाची काळजी 

सध्या देशामध्ये लम्पी या रोगाने थैमान घातले असून देशातील पशुपालक मोठ्या चिंतेत आहेत. अनेक जनावरांना या आजाराची लागण झाल्याने देशभरात 57 हजार हून अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लम्पी  स्किन या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न चालू असून, टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.राज्याच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे,प्रतिबंधात्मक लशी टोचण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. लम्पी स्कीन हा व्हायरस नेमका आहे तरी कसा? याची आपण माहिती घेणार आहोत..

सन 2019 मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती. या रोगामुळे जनावरांच्या शरीराला गाठी येतात, कालांतराने या गाठींचा आकार मोठा होतो. तसेच काही जनावरांमध्ये पाय सुजण्याचे प्रकारही आढळून आले आहेत.गाय वर्गीय जनावरांमध्ये या आजाराचे परिणाम दिसून आले आहेत.

 लम्पी रोगाची लक्षणे

  • सदर रोगाची लक्षणे जनावरे चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद करणे.
  • भरपूर ताप येणे.
  • डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येणे.
  • अंगावर गाठी उठणे.
  • दूध कमी देणे.
  • जनावरांच्या पायांना सूज येणे.

घ्यावयाची खबरदारी

सदर रोग होऊ नये म्हणून पशुपालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. गायी वर्गातील जनावरांना याची लागण मोठ्या प्रमाणात होत असून,गोठ्यात स्वछता राखावी ,गोचीड गोमाशा होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

तसेच वरील लक्षणे दिसून आल्यास सदर जनावराला विलगीकरण करावे.त्याचे खाणे पिणे स्वतंत्र ठेवावे.व याबाबत संबंधित शासकीय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *