श्री गणेश आरती संग्रह गणपती बाप्पा मोरया

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळाची
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती जय देव जय देव || धृ ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव || 2 ||

लंबोदर पितांबर फनीवर बंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव || ३ ||

दुर्गादेवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥
जय देवी जय देवी महिषा सुरमर्दिनी
सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी जय देव जयदेव॥धृ॥

त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही जय देवी ॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा जयदेवी जयदेवी॥३॥

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।।1।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ||धृ||

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा
जय देव जयदेव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा जय देव जयदेव ||2||

देवी दैत्यी सागरमंथन पै केले
त्यामाजी अवचित हलाहल उठिले
ते त्वा असुरपणे प्राशन केले
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले।। जय देव ।।3।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी
रघुकुळटिळक रामदासा अंतरी
जय देव जय देव जय श्रीशंकरा ||4||

विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जयदेव जयदेव ||धृ||

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी
गरूड हनुमंत पुढे उभे राहती
जय देव || 2||

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवळिती राजा विठोबा सावळा
जय देव ||3||

ओवाळू आरत्या कुरवंडया
येती
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती
जय देव ||4||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती
जय देव जय देव ||5||

श्री गुरुदत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा
नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव जय देव ||धृ||

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेल ही मात
परा ही परतली तेथे कैचा हा हेत जन्मरमरण्याचा पुरलासे अंत
जय देव जय देव ||2||

दत्त येऊनिया उभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला जन्ममरण्याचा फेरा चुकविला
जय देव जय देव ||3||

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मीतूपणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान
जय देव जय देव ||4||

|| घालिन लोटांगण ||

घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे
प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन
भावे ओवाळिन म्हणे नामा||1||

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव ||2||

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात्
करोमि यद्यत् सकलं परस्मै
नारायणायेती समर्पयामि ||3||

अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं हरि
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे
मंगलमुर्ती मोरया
गणपतिबाप्पा मोरया

मंत्रपुष्पांजली मंत्र

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानी धर्माणि प्रथमान्यासन्
तेहनाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा:
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने
नमो वयं वै श्रवणाय कुर्महे
स मे कामान काम कामाय मह्यं
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:

ॐ स्वस्ति। साम्राज्य, भौज्यं,स्वाराज्यं,वैराज्यं,पारमेष्ठ्यं, राज्यं,महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् ,सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्
पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति
गणपती बाप्पा मोरया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *