इचलकरंजी-शैलेन्द्र चव्हाण
सहकारी बॕंकींग क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेल्या तसेच 44 शाखांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये यशस्वीपणे कार्यरत असलेल्या कल्लाप्पाना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॕंकेस भारतीय रिझर्व बॕंकेने बोरगांव ता.निपाणी जि.बेळगांव व पलूस ता.पलूस जि.सांगली या ठिकाणी नवीन शाखा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.अशी माहिती बॕंकेचे चेअरमन श्री स्वप्नील आवाडे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले बॕंकेचा पारदर्शक कारभार व बॕंक अत्याधुनिक बॕंकींग सेवा देण्यामध्ये नेहमी अग्रेसर असल्यामुळेच बॕंकेला दोन नवीन शाखा सुरु करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॕंकेने परवानगी दिली आहे.

तसेच सभासद,ग्राहक,व हितचिंतक यांची बॕंकेस नेहमीच लाभलेली अनमोल व अतुट साथ यामुळेच बॕंक दिवसेंदिवस प्रगती करत असल्याचा निर्वाळा बॕंकेचे चेअरमन यानी दिला येथून पूढील काळातही बॕंकेची यशस्वीपणे वाटचाल ठेवण्यासाठी बॕंकेची चौफेर प्रगती करण्यासाठी बॕंक व्यवस्थापन नेहमीच कटीबध्द राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी बॕंकेचे व्हा.चेअरमन सीए,संजयकुमार अनीगोळ,बोर्ड आॕफ मॕंनेंजमेंटचे चेअरमन सीए.चंन्द्रकांत चौगुले,सर्व संचालक,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगांवे ,जनरल मॕंनेंजर किरण पाटील व दिपक पाटील,अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.