गोड विषासारखी टाळाटाळ करण्याची सवय 

अथर्ववेदात सांगितलं आहे की, हृदयाची शक्ती आणि मनाचा संकल्प जेव्हा एखाद्या कामाला लागतात तेव्हा ते कार्य उत्तम रितीने संपन्न होत जाते. प्रत्येक व्यक्ती जसा घडवू पाहतो तसाच तो स्वत:ला घडवतो आणि त्याची सुरुवात मनात येणाऱ्या इच्छेने होते.मनाचे काम इच्छा उत्पन्न करणे आहे. जेव्हा मनात इच्छा उत्पन्न होते, कल्पनाशक्ती क्रियाशील होते आणि इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग शोधत राहते. जर मनाची इच्छा प्रबळ झाली तर काही क्षणानंतर तीच इच्छा अवचेतन मनाच्या कप्प्यात विलीन होऊन जाते. जर मनाची इच्छा बलवान असेल तर आपल्यात संकल्प शक्तीचा उदय होतो, जी वस्तुत: आपल्या आत्म्याची शक्ती आहे आणि त्यालाच आत्मशक्तीही संबोधले आहे. जेव्हा आपली आत्मशक्ती मजबूत होते, आपल्या इच्छा पूर्ण हेण्याची शक्यता वाढते. आत्मशक्तीच्या मार्गात सर्वात मोठा अडसर मनाची चंचलता आहे.

Sweet Home Image

मनाला स्थिर करण्यासाठी सूत्र म्हणजे प्रतिद्वंद्वाचा अवलंब करणे. असे केल्याने आपले मन निर्मळ होते आणि आपला स्वभाव अंतर्मुख होतो. जसे आपले दृष्टी बाहेरुन स्वतःकडे वळते त्यानंतर लक्ष्य सिद्धीचा मार्ग प्रशस्त होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *