साप्ताहिक राशिभविष्य दिनांक 9 ते 15 ऑक्टोबर

मेष
मेष राशीसाठी हा आठवडा लाभदायक आहे.नवनवीन योजना आखल्याने तुमच्या मनात नवचैतन्य असेल.सुरवातीच्या काळात कामे वेगात होतील.विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण असेल.आपला वेळ अभ्यासात घालवा.नोकरदार व्यक्तींसाठी चांगला आठवडा आहे.महिला वर्गात आनंदाचे वातावरण असेल.नवीन खरेदी कराल.

वृषभ
हा आठवडा आपल्याला संयमाने काम करण्यास सांगणारा आहे.आपण थोडं सबुरीने काम करा.आर्थिक प्राप्ती चांगली राहील.विवाह जुळतील.भाग्यकारक अनुभव येतील.खर्च वाढतील.नोकरदार मंडळींनी सावधानता बाळगा.रखडलेली कामे पूर्ण होतील.चिडचिड करू नका.

मिथुन
सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यपूर्तीचा आनंद मिळेल.काळजीमुळे मन उदास असेल.कामात कार्यकुशलता दाखवाल.आर्थिक परिस्थिती चांगली राहील.सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.

कर्क
हा आठवडा आपल्या राशीला खूप लाभदायक आहे.तुमचे जुने येणे वसूल होईल.आर्थिक आवक चांगली झाल्याने खर्च कराल.खरेदी कराल.काम करताना सावधानता बाळगा.हितशत्रू कटकारस्थान करू शकतील.गुरूंचा आशिर्वाद राहील.

सिंह
जरा सबुरीने वागा असा संदेश देणारा हा सप्ताह आहे.भाऊबंदकित वाद होण्याची चिन्हे आहेत. गैरसमज होतील.शारीरिक व्याधीने त्रस्त व्हाल.मोबदला चांगला मिळेल.रखडलेली कामे पूर्ण कराल.

कन्या
मागील घटनांचा अभ्यास करून नवीन योजना आखाल.तुमची नवीन कल्पना फळास येईल.आर्थिक आवक होईल,त्यामुळे देणे द्याल.कपड्याची खरेदी कराल.त्यातून लाभ होईल.विवाह जुळतील.मनोबल कमी राहील.

तूळ
रेंगाळलेल्या कामांना चालना द्याल.आर्थिक प्राप्ती चांगली होईल.खरेदी कराल.थकवा जाणवेल.शेतीची कामे कराल.बहिणीची काळजी वाटेल.कामात व्यस्त रहाल.एखादी नोकरीची संधी चालून येईल.

वृश्चिक
सदरचा आठवडा राशीच्या लोकांना छप्पर फाड के लाभ होईल. आर्थिक आवक चांगली होईल.शैक्षणिक, राजकीय,सामाजिक क्षेत्रात प्रगती कराल.संतती सौख्य लाभेल.प्रवासाचे योग्य.योग्य नियोजन कराल.

धनु
तुम्ही जे कराल तेच फळ मिळेल हे सांगणारा हा आठवडा आहे.मानसन्मान मिळेल.यश ,कीर्ती,धन लाभेल.आपल्या कामात दुर्लक्ष करू नका. प्रॉपर्टीची कामे पूर्ण कराल.आरोग्याची तक्रार जाणवेल.शिक्षणात आडकाठी येईल.विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल,अन्यथा यश मिळणार नाही.

मकर
हा आठवडा जो जे चिंताल ते मिळणार असा आहे.सामाजिक कामात भाग घ्याल.मानसन्मान मिळेल.प्रकृतीची काळजी घ्या.घाईगडबडीत वाहन चालवू नका. प्रवास कराल. धावपळ होईल.लेखक ,साहित्यिक मंडळींना काम खूप असल्याने कामाचा ताण सहन करावा लागेल.

कुंभ
घरात आनंदी वातावरण राहील.आपला तापट स्वभाव कमी करा.विपरीत घटनेतून लाभ संभवतो.अर्थीक आवक चांगली होईल.खूप दिवसापासून ज्या कामाची वाट बघत आहात ते काम पूर्णत्वास जाईल.महिलांना अधिक कष्ट करावे लागतील.विवाह जुळतील.विद्यार्थ्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

मीन
आपल्या स्वभावातील अहंपणा कमी करा.दिवाळी निमित्त आधीच खरेदी कराल.खर्च वाढेल.कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.मौजमजा कराल.घरच्या गोष्टीत लक्ष घालाल.विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील.खाण्यावर नियंत्रण ठेवा.मनोबल चांगले राहील.विद्यार्थी वर्गाला सन्मान मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *