मेष
आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस.घरात धार्मिक कार्यक्रमामुळे वातावरण आनंदित राहील.संतती कडून चांगली वार्ता मिळेल.
वृषभ
आपण वाट बघत असलेले काम आज पूर्ण होईल.घरात गोडधोड जेवणाचा बेत आखाल.
मिथुन
नियोजनात बदल करावा लागेल.घरात सामंजस्य ठेवाल.
कर्क
आपले अंदाज अचूक ठरतील.नोकरी व्यवसायात यश मिळेल.धनलाभ होण्याचे संकेत.
सिंह
आजचा दिवस कामात जाईल. मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील.प्रवासाची शक्यता.
कन्या
घरात आनंदी वातावरण राहील.धार्मिक कार्यक्रम आयोजित कराल.दिवस उत्तम राहील.पत्नीशी वाद टाळा.
तूळ
मित्रांच्या बरोबर वेळ घालवाल.जुने दिवस आठवतील.दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक
आजचा दिवस संयमाने घालवा. कार्यक्रमात वादविवाद होईल.त्यामुळे वाद वाढवू नका.
धनू
तुमचा रागीट पणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. नवीन कामे रखडतील.
मकर
घरासाठी मोठा खर्च होईल.घरातील मुलांची काळजी घ्या.शांततेने निर्णय घ्या.
कुंभ
प्रवासाचे योग. तुमचा स्वभाव तुम्हाला अडचणीत आणू शकतो. लोकांशी वागताना जपून.वाहन चालवताना काळजी घ्या.
मीन
आजचा दिवस धार्मिक कामात जाईल. घरात आनंदाचे वातावरण असेल.एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.