नमराह मस्जिद मुस्लिम समाजाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कबनूर-प्रतिनिधी
कबनूर येथील नमराह मस्जिद मुस्लिम समाजाच्या वतीने,एकता मेडिकल कॅम्प व नोबल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरामध्ये हृदयाची तपासणी, दातांची तपासणी,बीपी शुगर तसेच डोळे तपासणी,तसेच पोटांचे विकार आदीची तपासणी करण्यात आली.स्वागत व प्रास्ताविक हाफिज मुसा यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार,डॉक्टर आर. एस.खान,दत्ता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रा.पं.सदस्य सुधीर लिगाडे,सुनिता आडके,बलराम भोजने,डॉ अमोल भोरे,डॉ.हर्षवर्धन जोशी,डॉ.नईम टिप्पीमणी,मोहसीन पटेल,मौलाना मोहम्मदअली पटेल,हाफिज झाकीर कुन्नूर,मौलाना ईरशाद नदाफ,करीम सनदी,बाबाजान आपराज,यासह नमराह ग्रुपचे अध्यक्ष अब्दुल नाईक, उपाध्यक्ष जावेद शेख,सेक्रेटरी इरफान शेख,आदम सुतार,अन्वर शेख ,सुलतान शेख,जुबेर वालीकर,राज मुल्ला,मुनीर पेंढारी,यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार रियाज चिकोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *