ताराराणी आघाडीच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर  संपन्न

कबनूर-प्रतिनिधी
येथील ताराराणी महिला आघाडी व ताराराणी विकास आघाडी यांच्यावतीने रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबिराचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

रक्तदान करताना मा.उप सरपंच निलेश पाटील

स्वागत सुधीर लिगाडे यांनी केले. प्रास्ताविक मधुकर मणेरे यांनी केले. सदर शिबिरामध्ये डोळे व मोतीबिंदू तपासणी,हाडांचे आजार,किडनी विकार,रक्त तपासणी,ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या.यावेळी रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते.यामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

यावेळी जेष्ठ नेते  सुधाकरराव मणेरे,अशोक पाटील,मिलिंद कोले,माजी उप सरपंच निलेश पाटील,सरपंच शोभा पोवार,सुलोचना कट्टी, वैशाली कदम,मनोहर मणेरे,सुनीता आडके,सतिश परीट,सचिन सुतार,दीपक केटकाळे,सागर चराटे,भूषण मालगावे,अमित तवंदकर,शोभा शिऊडकर,सैफ मुजावर,बाळासाहेब मुजावर,बी.जी.देशमुख, विनायक गुंडकल्ले,यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार निलेश पाटील यांनी मानले.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *