श्री स्वामी समर्थ.
नमस्कार मित्रांनो,
काही लोक स्वामींची भक्तिभावाने पूजा करतात. सेवा करतात.स्वामी आपल्यावर प्रसन्न व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते.जर तुमच्याशी या गोष्टी होत असतील तर समजुन जा की,स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत.काही गोष्टी आपल्या सोबत घडत असतात पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही त्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत की नाही कस समजायचं?
आपण स्वामींची भक्तिभावाने व श्रद्धेने कोणताही विचार मनात न घेता सेवा केली तर स्वामी समर्थ आपल्यावर कृपा आशीर्वाद कायम ठेवतात.ते आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे राहतात. स्वामी महाराज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमार्फत संकेत देत असतात की ते आपल्यावर प्रसन्न आहेत की नाहीत.याच गोष्टी, हेच संकेत कसे असतात याची माहिती बघूया.
आपण स्वामींची भक्तिभावाने पूजा करतो सेवा करतो जप करतो.जर त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य असेल,तर समजुन जा की स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत.आपण स्वामी समोर भक्तिभावाने पूजा सेवा करीत असतो.सेवा करीत असताना जर आपल्या अवतीभवती फुलांचा सुगंध दरवळत असेल, ज्यामुळे आपल्याला शांत वाटत असेल, तर समजून जा स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत.
स्वामींचा तीसरा संकेत आहे की जर आपण स्वामींसमोर कोणतीही मागणी केल्यास,ती सहज मिळाल्यास समजून जायचं की स्वामी आपल्यावर खूप प्रसन्न आहेत.आपण स्वामींच्या फोटोकडे बघतो, त्यावेळेस स्वामींचे डोळे बोलके वाटत असेल, चेहरा बघून आपल्याला शांत वाटत असेल तर समजुन जा की,स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत.स्वामींची भक्तिभावाने पूजा सेवा जप केल्यास त्याचे फळ निश्चित मिळेल.
सदर माहिती विविध स्त्रोताद्वारे एकत्रित केलेली असून,याद्वारे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. केवळ समाजमान्य, ज्योतिषशास्त्रातील माहिती कथा माहित व्हावे यासाठी हा प्रयत्न.याचा कोणीही अंधश्रद्धा म्हणून चुकूनही वापर करू नये.धन्यवाद.