कबनूर- प्रतिनिधी
इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था ही सभासदाना प्रत्येक वर्षी लाभांश रुपात भेटवस्तू देणारी राज्यातील एकमेव गृहनिर्माण संस्था आहे असे प्रतिपादन कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यानी केले.ते संस्थेच्या भेटवस्तू वितरण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.
चेअरमन दिलीपराव झोळ यानी प्रास्ताविक केले.संस्थेने सभासदाना प्रत्येक वर्षी भेटवस्तू देण्याची परंपरा कायम राखली आहे.संस्थेने सभासदासाठी क्रीडांगण,बागबगीचा, जीम व सीसीटीव्ही कॕमे-याची व्यवस्था केली आहे.त्यामुळे सभासद वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जेष्ठ सभासद सुधाकरराव मणेरे, पांडुरंग राजमाने, मारुती वाशीकर व मान्यवरांच्या हस्ते सभासदाना भेटवस्तूंचे वितरण झाले यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक अनिल कुलकर्णी, सुरेंद्र मगदूम, महंमदयुनुस खतीब, रविंद्र सावंत, दत्तात्रय भिलवडीकर, विक्रांत दानोळीकर, रामचंद्र भोसले, बाळासो ऐनापुरे, सुधाकर ताडे, नसीर सर्जेखान, विशाल दास, विजय देसाई, विजयमाला जाधव, सुनिता शिंगाडे, सचिव शिवय्या जंगम, सभासद आदि उपस्थित होते. व्हाईस चेअरमन अशोक वसगडे यानी आभार मानले. वैशाली पाटील यानी सूत्रसंचलन केले.