दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा; दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली

इचलकरंजी – प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली असून बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहे.त्यामुळे मुख्य रस्त्यांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Advertise

दिवाळीचा सण मोठा,आनंदाला नाही तोटा.अगदी गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या घरी साजरा होणारा सन दिवाळी.दिवाळी आली की रंगबेरंगी आकाशकंदील,लायटिंगच्या माळा,कपडे,फर्निचर,फराळाचे पदार्थ खरेदीसाठी मोठी गर्दी होते.

झेंडूच्या फुलांची यानिमित्ताने बाजारात आवक झाली आहे.त्याच बरोबर पूजेसाठी लागणारी फळे,पणत्या,अगरबत्ती आदींची दुकाने सजली आहेत.पूजेचे साहित्य,रांगोळ्या,कपडे यांचे लहान मोठे स्टॉल रस्त्यावर लावून साहित्याची विक्री केली जात आहे. यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.

आधीच्या काळात सुमारे 4-5 वर्षांपूर्वी फराळ घरातच करण्यावर भर दिला जायचा.गल्लीतील महिला एकमेकांच्या घरी फराळ तयार करण्यासाठी जायच्या.मात्र अलीकडच्या काळात वाढत्या धकाधकीच्या जीवनात तयार फराळ आणण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. मात्र आजही बहुतांश घरात फराळ घरातच बनवतात हे विशेष.

Advertise

इचलकरंजी सह आसपासच्या गावात दिवाळीपूर्वी बोनस देण्याची पद्धत आहे. यामध्ये 15 टक्के पासून 30 टक्यापर्यंत बोनस वाटला जातो.यामध्ये सरासरी 25 ते 30 हजार बोनस मिळतो.त्यामुळे वस्त्रनगरीत दिवाळी जोरात साजरी केली जाते.

दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. यामुळे सराफ बाजारात नव चैतन्य निर्माण होते.सोने महाग झाले असले तरीही ग्राहकांचा सोने खरेदी करण्यासाठी उत्साही असतात.इचलकरंजी मध्ये सराफ बाजारातही यामुळे नवचैतन्य येते.

रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अगदी कमी किंमतीत बूट,चप्पलचे स्टॉल लावलेले दिसतात.अगदी दुकानात मिळणारे बूट कमी किंमतीत याठिकाणी उपलब्ध असतात.त्यामुळे ग्राहकांची बूट खरेदीसाठी गर्दी असते.त्यामुळे या व्यवसायाला ही हातभार मिळतो व ग्राहकांनाही कमी किंमतीत वस्तू मिळते.

Advertise

दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात आकाशकंदीलही दाखल झाले आहेत.अगदी बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदील पासून ते प्लास्टिकचे आकाशकंदील उपलब्ध आहेत.आकाशकंदील मध्येही आता विविध प्रकारची व्हरायटी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीनुसार आकाशकंदील उपलब्ध आहेत.

पूजेसाठी लागणारी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तसेच पूजेसाठी लागणारे ऊस,केळीचे खुंट दाखल झाले आहेत.यातून थोड्याफार प्रमाणात त्यांच्याही शेत मालाला बाजारपेठ मिळते.

अशाप्रकारे दिवाळीची धामधूम सुरू असून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून दिवाळीचा आंनद प्रत्येक जण लुटत आहे.यानिमित्ताने अनेकांना रोजगार मिळाला असून प्रत्येकाची दिवाळी यानिमित्ताने गोड होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *