ऊस दरासाठी स्वाभिमानीचे “चक्का जाम” आंदोलन

कबनूर-प्रतिनिधी
येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.व लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा अजून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

Advertise

सुमारे 2 महिन्यापासून ऊस दराचा तिढा सुटलेला नाही. कोणताच तोडगा न निघाल्याने ऊस तोडणी बंद आहे.मागील गेलेल्या ऊसाचे 400 रुपये व आताच्या ऊसाला 3500 रुपये दर मिळावा यासाठी कबनूर चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

कोण म्हणतंय देत नाय,घेतल्या शिवाय राहत नाही.शेतकऱ्याच्या हक्काच्या घामाचं दाम मिळालंच पाहिजे.अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी धुळगोंडा पाटील,मिलिंद कोले,जीवंधर बलवान यांनी मनोगत व्यक्त केले.

यानंतर पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली,यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी राजाराम वाकरेकर, महादेव पाटील,विद्यासागर चराटे,विनोद मुरचिटे, संजय मगदूम,अल्लाबक्ष सनदी,राजाराम शिंदे,यांसह चंदूर,साजणी,रुई,तीळवणी भागातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *