इचलकरंजी-प्रतिनिधी
सरकारने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय नोकर भरती यापुढे खाजगीकरण व कंत्राटीकरणाद्वारे करण्यात येणार आहे.या निर्णयास इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध आहे.तरी सरकारने खाजगीकरण व कंत्राटीकरणाद्वारे शासकीय निम शासकीय नोकर भरती करू नये.प्रचलित नियमानुसारच शासकीय व निमशासकीय नोकर भरती करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना इचलकरंजी प्रांताधिकारी सो यांच्यामार्फत इचलकरंजी शैक्षणिक व्यासपीठ चे अध्यक्ष प्रा शेखर शहा यांच्यासह शिष्टमंडळाने दिले.

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची खाजगीकरणाद्वारे कंत्राटीकरण पद्धतीने भरती करणे ही महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रला शोभणारी गोष्ट नाही.शाहू- फुले -आंबेडकर यांच्या विचारसरणी विरोधी खाजगीकरणाचे
धोरण असल्याचे शेखर शहा यांनी स्पष्ट केले.सदर चे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्विकारले.

सदर शिष्टमंडळामध्ये मुख्याध्यापक पी डी शिंदे, इरफान अन्सारी,अशोक हूबळे, वि ह सपाटे, संजय परीट, संजय लोटके,किरण दिवटे,संजय देमांना, प्रशांत गुरव,अरविंद शेळके,मोहम्मद नाकाडे, मोहन वाघमारे आदी सह शैक्षणिक व्यासपीठ इचलकरंजीचे पदाधिकारी यांचा समावेश होता.