माणकापूरात पत्रकारांचा सत्कार व स्नेसमेळावा संपन्न

इचलकरंजी/प्रतिनिधी
माणकापूर (ता. निपाणी) येथील निसर्गराजा ग्रुपच्यावतीने दरवर्षी प्रमाणे “आद्यपत्रकार दर्पणकार- बाळशास्त्री जांभेकर” यांच्या जयंती निमित्त यावर्षीही “पत्रकारांचा सत्कार सोहळा व स्नेहमेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष व दैनिक महासत्ता वार्ताहर शिवाजी येडवान यांना नुकताच “कोल्हापूर जिल्हा रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सन २०२४ यावर्षीचा “निपाणी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार” मिळालेबद्दल “स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष- मा. दत्ता मांजरे- तारदाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा श्रीमती नंदिनीताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी येडवान यांना फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertise

यावेळी जेष्ठ पत्रकार व शाहिर- संभाजी माने यांची “कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स‌‌‌ वेल्फेअर असोसिएशनच्या निपाणी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती” झाल्याबद्दल आणि जेष्ठ पत्रकार- दिलिपतात्या कोळी यांना “महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल तसेच “निपाणी तालुका पत्रकार संघाचे” नुतन उपाध्यक्ष अनिल नवाळे, “इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे सचिव”- शिवानंद रावळ व खजिनदार- महावीर चिंचणे आणि “इचलकरंजी प्रेस क्लबचे” खजिनदार शैलेंद्र चव्हाण यांना निसर्गराजा ग्रुपच्यावतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Advertise

यावेळी सत्कारमूर्ती सर्व पत्रकार,दत्ता मांजरे,नंदिनीताई कदम, रामचंद्र रेवडे व श्रीपती संकपाळ, रंगराव बन्ने,तानाजी बिरनाळे, मयुरी नाईक, जवाहर साखर कारखान्याचे कर्मचारी महादेव येलाज आदी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन निसर्गराजाग्रुपला शुभेच्छा व्यक्त केल्या.

Advertise

सदर कार्यक्रम प्रसंगी पत्रकार रामचंद्र ठिकणे,शितल पाटील,प्रशांत कांबळे, संजय अवघडी, योगेश माने, रामचंद्र डेंगळे,जवाहर साखर कारखान्याचे पॅन इन्चार्ज विलासराव पाटील, फिटर जयवंत माने व कर्मचारी स्टाफ तसेच प्रहार न्युजचे संपादक विकास गायकवाड, हिरकणी न्युजचे कर्नाटक संपादक बबन जामदार, मलकारी सपाटे, सिध्दाप्पा गावडे,ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल काटकर,फोटोग्राफर अमर येडवान व प्रकाश काटकर आदी प्रमुख मान्यवरांसह चॅलेंज ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गुणवंत कामगार व कवि साताप्पा सुतार यांनी आपल्या कविता सादरीकरण व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर शिवाजी येडवान यांनी स्वागत व प्रास्ताविक व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *