मिठाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू पैसा तुमच्याकडे येईल

नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ
तुमच्या घरात भांडण तंटा आहे, तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभत नाही, घरामध्ये सतत लोक आजारी पडत असतील तर, एक साधा उपाय आज आपण तुम्हाला सांगणार आहोत. जो उपाय करून तुम्ही घरामध्ये स्थैर प्राप्त करू शकता.या उपायाला पैसे लागणार नाहीत,केवळ मिठाच्या बरणीमध्ये ही एक वस्तू ठेवल्यास तुमच्या सर्व समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकतात.

तुमच्यामध्ये टॅलेंट आहे तुमच्यामध्ये, सर्व चांगले गुण आहेत, मात्र एखादी गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नसाल. प्रत्येक काम शेवटच्या टप्प्यावर जाऊन अडकत असेल,कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळत नसेल,तुम्ही अनेक उपाय करून थकला असाल, तर हा रामबाण उपाय आपण फक्त एकदा करून बघा याच्या रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटेल.


सदर उपाय हा मिठाचा उपाय म्हणून आपण बघणार आहोत. कारण मीठ ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक वेळ साखर नसेल तर चालेल पण कोणत्याही वस्तूमध्ये मीठ नसेल तर ते चालू शकत नाही. कारण मिठाशिवाय सर्व पदार्थ बेचव असतात. त्यामुळे मिठाला अनन्य साधारण महत्त्व आहे.


आपल्या स्वयंपाक घरात मिठाचा जो डबा आहे, त्या मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे ती खूप महत्त्वाची पण आपल्या घरात आढळणारी सहजपणे वापरली जाणारे गोष्ट म्हणजे “लवंग”.


मिठाच्या डब्यामध्ये लवंगा ठेवताना दोन पेक्षा अधिक ठेवाव्यात. हा मिठाचा डबा काचेचा असावा.


आता अनेकांना वाटेल की हा उपाय केल्याने पैसा असाच आपल्या घरी येईल का? असे जर केले असते तर काम करण्याची गरज काय उरली असती? पण आपण हे समजून घेतले पाहिजे की ,कष्ट केल्याशिवाय तुमच्याकडे धन येणारच नाही. कष्टाशिवाय पर्याय नाही. मात्र तुमच्याकडे आलेला पैसा,धन व्यवस्थितरीत्या टिकून राहावे, घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी, सकारात्मक ऊर्जा राहावी, घरात आनंदी वातावरण रहावे यासाठी हा उपाय आहे.कोणताही उपाय करताना श्रद्धापूर्वक केल्यास त्याचे फळ नक्की भेटते.श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी.
श्री स्वामी समर्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *