या सवयी तुमचा “जीव” घेऊ शकतात

सध्या मनुष्य अनेक विकारानी त्रस्त असून त्यातील आपली झोप उडवणारा महत्त्वाचा विकार म्हणजे किडनीचा विकार.अलीकडचा वाढता फास्टफूड युक्त आहार,खराब सवयी तसेच दैनंदिन जीवनातील औषधांचे वाढते प्रमाण हे घटक किडनी विकार होण्यासाठी कारणीभूत ठरतात.


तुमच्या वाईट सवयी तुमच्या जीवावर बेतू शकतात.ऐकून धक्का बसला ना?हो.वाईट सवयी ज्या तुमचं,अचानक जगणं हिरावून घेऊ शकतात. so be carefull

अतिप्रमाणात औषधे घेणे
किडनी खराब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे औषधांचा अति प्रमाणात वापर होय. लहान मुलांना कधीकधी त्वरित गुण येण्यासाठी अधिक मात्रा असलेले डोस दिले जातात, याचा परिणाम त्यांच्या थेट किडनीवर होऊन किडनीची कार्यक्षमता बिघडली जाते. त्यामुळे औषधांचा अतिवापर देखील किडनीसाठी घातक ठरू शकतो.काहींना वारंवार पेन किलर किंवा अँटिबायोटिक गोळ्या घेण्याची सवय असते. डॉक्टरांच्या सल्ल्याविना गोळ्या खाण्याची सवय अनेकांना असते, ही सवयी देखील तुमचे किडनी खराब होण्याचे कारण बनू शकते.त्यामुळे योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

मद्यपान

मध्यपान करणे ही आजकाल फॅशन झाली आहे.अनेक लोक रोज मध्यपान करण्याकडे आकर्षित होतात. जणू त्यांच्या जीवनाचा तो भाग झालेला आहे. मात्र हीच सवयी तुमच्या किडनीवर विपरीत परिणाम करू शकत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.तसेच सिगारेट तंबाखू आदीची सवयी घातक ठरू शकते.

लठ्ठपणा किंवा अधिक प्रमाणात खाणे हे देखील किडनी खराब होण्याचे मुख्य कारण असू शकते. शरीराच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात अन्न सेवन केल्याने किडनी खराब होण्याचे चान्सेस असतात.त्यामुळे जपून आणि मापून खा.

सतत काळजी करत राहणे हे देखील निद्रानाशाचा प्रमुख कारण असू शकते. आणि निद्रा नाशामुळे आपली झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील दैनंदिन क्रियेवर परिणाम होऊन याचा परिणाम आपल्या किडनीवर होऊ शकतो.त्यामुळे पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.

मांसाहार
प्रत्येक व्यक्तीला नॉनव्हेज आवडेल असं नाही पण नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक दिसते.कारण नॉनव्हेज मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन व कॅलरीज असल्यामुळे त्याचा परिणाम थेट किडनीवर होतो.नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये किडनी स्टोनची समस्या देखील खूप प्रमाणात आढळते.

अती मीठाचे सेवन
काही लोकांना गोड खाण्याचे तर काही लोकांना प्रत्येक पदार्थांमध्ये, भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये वरून मीठ घेण्याची सवय असते.हे अती मीठ घेणे सुद्धा किडनी रोगाचे कारण ठरू शकते. मिठामुळे ब्लडप्रेशर वाढतो आणि त्याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो.

पाण्याची कमतरता
शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासू न देणे महत्त्वाचे आहे. कारण पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढत असते. कारण ही विषारी द्रव्ये किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. त्यामुळे कमी पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

म्हणून आपण चांगले तर जग चांगले त्यामुळे अशा गोष्टी टाळा ज्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होईल.स्वस्थ जगा, आनंदी राहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *